पोस्ट्स
नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
गझलेचे रसग्रहण
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*वाचले ना चाळले त्यांनी मला बघ कसे चुरगाळले त्यांनी मला* वर्चस्व सिद्ध करण्याची घाई असली की बरेचदा प्रस्थापित लोक इतरांना बदनाम करतात. पूर्वग्रहदूषितपणाही असू शकतो. वाचणे.. सखोलपणे जाणणे चाळणे.. वरवर पहाणे हे काही न करता म्हणजेच जाणून न घेता हेटाळणी केल्याचे, त्यांना हवा तोच वापर करून घेतल्याचे शल्य यातून दिसते. चूरगाळणे.. नाकारणे, फेकून देणे *खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी* *याचसाठी जाळले त्यांनी मला* माझे विचार, व्यक्तीमत्व नकोआहेत. त्याची भिती आहे. मी पुन्हा उभारी घेऊ नये यासाठी मला कायमचे नष्ट केले. * आजही केली सुखांची याचना* *आजही फेटाळले त्यांनी मला* स्रिया, समाजात अनेक कारणांमुळे दुय्यम स्थान असणाऱ्या साऱ्यांना कायद्याने समान न्याय दिला आहे. या काळातही हक्कांची जाणीव करून दिली की नकोसे असते. सुखाची याचना करावी लागते. होईल तेवढा अपमान करून माझी मागणीच फेटाळून लागली. की शक्यताच उत्पन्न होऊ नये. * बोकडासम कापतांना समजले* *आजवर का पाळले त्यांनी मला* उपेक्षितांचे जीणे दुय्यमतेचे. कधी लाड झालेच तर समजून घ्यावे, काही तरी फायद्यासाठी होत आहेत...