पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ganesha

इमेज
 

गणेश

इमेज
 

गणेश सुप्रभात

इमेज
 

तळीये.. आनंदकंद गझल

 वृत्त-आनंदकंद गागालगा लगागा गागालगा लगागा पाणीच मातलेले गावास वाटले रे आक्रोश दाटलेले गावास वाटले रे एका क्षणात आले आक्रीत काळरूपी आभाळ फाटलेले गावास वाटले रे प्रेतास शोधताना काळीज ठार झाले डोळेच गोठलेले गावास वाटले रे कोणास हाक मारू झाला पहा ढिगारा समशान थाटलेले गावास वाटले रे  नामोनिशाण मिटले होते इथे तळीये  इतिहास गाडलेले गावास वाटले रे अर्चना मुरुगकर

गणेश

इमेज
 

Ganesha

इमेज
 

पाऊस

  वृत्त -समुदितमदना 8+8+8+3 *प्रलयच आला जणू* पाउस आहे जीवनदायी पोषणकर्ता जगी पशुपक्षी अन  शेतकऱ्यांच्या दाणा पाणी मुखी चातक बनुनी धरणीमाता स्वागतकर्ती उभी आतुरतेने वाट पाहते ये लवकर कर सुखी रूप बदलुनी आला वाटे विध्वंसक हा दिसे अवचित पाणी धावत सुटले सैरावैरा पळे रौद्ररूप हे धारण केले काळच बनला  जणू जलमय झाले सगळे जीवन जना रडू कोसळे    घरात शिरुनी  दैना केली मुक्त उधळला असे  डोंगर झाडे पाडत फिरतो राक्षस भासे अता तांडव चाले मृत्यूचा जो प्रलयच आला जणू शेतीवाडी नेली धुवुनी सगळे खचले अता आक्रोशाचा डोंब उसळता डोळे देवाकडे आशेने तो घालत आहे मदतीचे साकडे जनता बनली भयभीत अता नेते झेपावले आरोपांच्या फुशारक्यांच्या झडती फैरी गडे अर्चना मुरुगकर

गणेश

इमेज
 

संभ्रम पडता तरून जावे

इमेज
  संभ्रम पडता तरून जावे गुरूस करतो वंदन आम्ही असे संस्कृती आमची जाणिवेचा क्षण नकळे जरी प्रथा आतल्या श्रद्धा भक्तीची दबकत दबकत जाता पुढती विश्वासाने बोट पकडतो नकळत आमच्या आम्ही आता जगामध्ये चालू लागतो अंतर्बाह्य जाणती आम्हाला प्रकाशाच्या दाखवती वाटा जवळ असता त्याच्या आम्ही आनंदाला नसतो तोटा खडतर अवघड रस्ता दिसतो प्रश्नांचे मग काहूर उठते आधार मिळता आम्हा गुरूंचा सहज सुंदर वाट सापडते नतमस्तक मी चरणावरती वंदन करते मनोभावे दिशा दाखवे गुरुमाऊली संभ्रम पडता तरून जावे अर्चना मुरुगकर तळेगाव दाभाडे

(कविता) हवी माणसे सदा भोवती

इमेज
मात्रा-8+8+8+3 वृत्त -समुदितमदना *हवी माणसे सदा भोवती* कुणा म्हणावे आपले असे प्रश्नच पडतो मला मुखवट्यातुनी गोड बोलुनी फसवत जाती मला डोळे मिटुनी स्वार्थ साधती मांजरापरी खरे तोटा सारा  विसरते तरी खंत बोचते मला निस्वार्थी जी खरी माणसे देतच जाती मला बनते ओझे  घेता घेता मीच कोसते मला टाळत जाते उभी रहाते पायावरती जरा अंतर राखत जगणे अता बरे वाटते मला मेळ्यामध्ये आप्तजनांच्या हरवत जाते जरा बनते जत्रा आयुष्याची गरगर फिरते पुन्हा संभ्रम सोडत स्विकारते मग असती त्यांना तशी शुद्ध मनाची तशी माणसे भेटत जाती पुन्हा अशी माणसे तशी माणसे कशी माणसे जरी हवी माणसे सदा भोवती असे वाटते मला स्वत:लाच मी वळवत जाते जाणत जाते जगा प्रेमच द्यावे प्रेमच घ्यावे असे वाटते मला अर्चना मुरुगकर

गझल वृत्त-रागरंग

इमेज
 वृत्त -रंगराग गालगा लगागागा गालगा लगागागा राजसी पलंगाचा थाट ही नको आहे कष्ट ज्यात नाही ते ताट ही नको आहे सोहळे सभेमध्ये चालल्या गळाभेटी बेगडी प्रसिद्धीची लाट ही नको आहे साखळ्या पहाऱ्यांची बंधने नको आता कालबाह्य रूढींची वाटही नको आहे गोड बोलतो स्वार्थी कार्य साधण्यासाठी मतलबी स्वभावाचा भाटही नको आहे रोग तोच आताही नांदतो जगामध्ये रांधण्या सणासाठी हाटही नको आहे अर्चना मुरुगकर

गणेशा

इमेज
 

Ganesha

इमेज
 

गझल तोटक

इमेज
 

आरसा

 असा असावा आरसा वाढे मनाचा उत्साह कधी नयनी अंजन हरे मनाचा उत्साह. मृगा दिसे मृगजळ ससा दिसावा ससुल्या  लांडग्याला धूर्तपणा वाघोबाला वाकुल्या बैला दिसे बैलगाडी गाढवाला बावळट गाई वासरू हंबरी उंटा दिसे वाळवंट. पोपटाला पोपटपंची घार चपळच भासे  पिले पाही काळजीने रूप आगळेच भासे असा असावा आरसा दिसो सत्याचा चेहरा गुण दिसो ज्याचे त्याला करी जीवना इशारा रमेश मुरुगकर

गझल

इमेज
  वृत्त- तोटक ललगा ललगा ललगा ललगा यमपाश अता टळणार कसे नित रोग दिसे पळणार कसे भवपाश मनी तुटलाच अता मनमीत तिचे कळणार कसे सगळेच इथे ढवळे बगळे वगळून नवे मिळणार कसे बरसात दिसे जळली नुकती जमिनीत अशा फळणार कसे सडके कुजके जमले भवती टाळून तया वळणार कसे अर्चना मुरुगकर

गणेश

इमेज
 

थेंब थबकुनी इथे थांबतो

इमेज
 

हळूवार म्हणू

इमेज
 

गझल

इमेज
 *वृत्त -कलावती* लगालगा ललगागा लगालगा गागा असेल त्याच सुखाला जपायचे आहे हसून याच दिसांना बघायचे आहे अनंत डंख जगाने दिले नसे चिंता फिरून त्यात मनाला तरायचे आहे मजेत वागत जावे जगासवे वेड्या कशास खंगत जातो जगायचे आहे फकीर तू धरतीवर असेच चालावे कधीतरी जगताना मरायचे आहे कशास माजवतो यादवी जगामध्ये प्रभूस त्या भवताली पहायचे आहे अर्चना मुरुगकर. 

अभंग

इमेज
  दिनांक - १३ जुलै २०२१ विषय : विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठल अभंग रचना - ६-६-४  *शीर्षक : ठेवा अभंगांचा, मुखी गाऊ*  मायबाप माझा| विठु माऊली तू| सावळा सखा तू| पांडुरंगा ||१|| उभा पंढरीसी| राजा वीटेवरी || कर कटेवरी | ठेवुनीया||२|| भागवत धर्म| भेदाभेद नसे| भक्ती नांदतसे| सर्वत्रच||३|| आस भेटीलागी| पाऊले चालती| वारीच्या संगती| पंढरीसी ||४|| नाही भेट झाली| चुकली पायरी| दु:खी वारकरी| कोरोनाने ||५|| जाणुनी संदेश| संत सज्जनांचा| ठेवा अभंगांचा| मुखी गाऊ||६|| संयम धरावा| नियम पाळावा | काळ ओळवावा | शहाण्याने||७|| ज्ञानामृत मिळे| वाचून ग्रंथांना | आचरणी आणा | उपदेशा ||८|| समतेचा झेंडा| रोवू जगामध्ये| रंगू भक्तीमध्ये| नाचू गाऊ||९|| सौ. अर्चना रमेश मुरुगकर  तळेगाव दाभाडे-पुणे

कविता पावसाची

इमेज
  कविता पावसाची गंमत जंमत होती सारी पावसामध्ये बालपणीच्या सततंधारा वळचणीतुनी गाण्यामधुनी भिंगोऱ्यांच्या सुसाटवारा कोसळधारा काॅलेजमधल्या रस्त्यावरचा मन भाजताना धुंद होतसे काळ असे तो मोहरण्याचा पाऊस हरित डोंगरमाथी सोहळाच नव तारुण्याचा उत्साहाला येई भरती मित्रांसंगे चढतानाचा खळखळ भरभर पाणी वाहे धबधब्यातुनी ओढ्यांमध्ये तुडुंब भरल्या नदीत दिसतो थेंबांमध्ये धारांमध्ये अवनी बनते सुंदर तरणी हिरवाईचा शालु नेसुनी झरे वाहती चैतन्याचे फुले लगडली पानांमधुनी पडतो वेडा पाऊस असा  तनामनात रुजून बसला दिसता निर्मळ धारा याच्या आठवणीने पुन्हा झिरपला पाऊस असे विरह तराणे पाऊस जसा प्रणय खुणावे पाऊस असे उधाणवारा चराचराने गाणे गावे अर्चना मुरुगकर 🌧💦

क्लाऊडमध्ये मेघ दिसतो

इमेज
  क्लाऊडमध्ये मेघ दिसतो  कालिदास लपलेला इथे 'मेघदूत' मी जगतो आहे मेघ जरी ना मला भेटला व्हाट्सअपची साथ आहे करतो अल्लड विनवण्या नेटची साथ अखंड असू दे नकळत तिच्या तिला पाहू दे अपडेट पटकन स्टेटसचे दे छोटे मोठे विनोद दिसता साथ तिच्या हसण्याची दे खाणाखुणा पटकन समजुनी त्या टोकाला तीच असू दे डोळ्यामधले पाणी लपवती हसऱ्या बाहुल्या इमोजीतल्या प्रेम दाखवती हळूच दुरूनी गुलाब, बदाम ,नाचऱ्या बाहुल्या भांडण, रूसणे,हसणे, फसणे सारेच व्यक्त एका क्षणात सूचक व्हिडिओ मनधरणीचे डोस मौलिक हजर क्षणात क्लाऊडमध्ये मेघ दिसतो  तळमळ पोहोचे इथून तिथे संजयासमान बघतो सारे जशास तसे तिथले इथे प्रेम, विरह, ओढ तीच रे मेघसावळा अजून तसाच तंत्रज्ञान देई साथ मनाला व्यक्त होतो अजून तसाच अर्चना मुरुगकर

गझलवृत्त-सती (जलौघवेगा)

इमेज
 गझलवृत्त-सती (जलौघवेगा)  बळी गरीबी तुला सदाची बहाल आहे निसर्ग वागे मनाप्रमाणे कमाल आहे सुळीस देती तुझी गरीबी क्रमाक्रमाने तुझी कहाणी जगात आता मिसाल आहे नवीन धंदे नवीन वाटा पहात जाती तुझ्या प्रमाणे जगू पहाणे बकाल आहे दुरावताना उदास वाटे घरास अपुल्या दिसे चवन्नी नसे उपाशी धमाल आहे हताश वाटा नकोच आता पुन्हा जगावे  प्रयत्न वादी जगी स्वत:च्या खुशाल आहे अर्चना मुरुगकर

रंगराग गझल

इमेज
 गझल वृत्त रंगराग लगावली-गालगा लगागागा गालगा लगागागा हे तुझे असे खोटे वागणे बरे नाही प्रेम भावना माझ्या तोडणे बरे नाही मित्र मानता मागे बोलणे अविश्वासी जोजवून नात्याला मोडणे बरे नाही भाव देत पैशाला तोलणे मना लागे सार तेच जीवाचे मानणे बरे नाही चंद्र झोपला होता रात्र लोटली सारी आस खंगली माझी टाळणे बरे नाही रोज येत स्वप्नाशी थांबणे असे का रे?  घाव तेच प्रेमाला घालणे बरे नाही अर्चना मुरूगकर

गझल आनंदकंद

इमेज
  गझल वृत्त -आनंदकंद गागालगा लगागा गागालगा लगागा गर्वास टाक साऱ्या जाळून माणसा तू लीनत्व ठेव अंगी जोडून माणसा तू सत्तेस लाटतो तू सोडून लाज सारी मूल्यास बाणवावे शोधून माणसा तू लोकात बोलतो तू आदर्श तेच सारे सत्यात वाग तैसा शोधून माणसा तू पोटात पाप काळे ठेवून हिंडसी का घे माणसास साऱ्या सांधून माणसा तू माणूस माणसाशी होवून वाग आता मिथ्यातल्या मिजाशी सोडून माणसा तू अर्चना मुरूगकर

आनंदकंद गझल

इमेज
  ** आनंदकंद ( तरही गझल ) गागालगा लगागा गागालगा लगागा                ( जे चांगले जुने ते सांगायचे नव्याने ) गझलकार विजय खाडे यांचा उला मिसरा जे चांगले जुने ते सांगायचे नव्याने ते बोल साखरेचे बोलायचे नव्याने त्वेषात भांडताना काळीज भंगलेले हातात हात घेता सांधायचे नव्याने चित्कार अंतरीचे रोगात आप्त गेले आधार जीवनाचे शोधायचे नव्याने अंगार पेटलेले पाण्याविना उन्हाळे कासार गारव्याचे बांधायचे नव्याने भागीरथास भेटे गंगा प्रयत्नवादे कष्टात घर्मबिंदू गाळायचे नव्याने अर्चना मुरूगकर
इमेज
 वृत्तबद्ध काव्य प्रेमी अष्टाक्षरी कविता माहेर माझे माहेर लाडाचे करी कौतुक गुणांचे बने व्यक्तीमत्व सारे सार त्यांच्या संस्काराचे आई प्रेमाने रांधते बाबा जवळ बसती  नांदे प्रेमाचे गोकुळ ओटी प्रेमाने भरती  लेक माहेरी जाताच लाड भाच्यांचे करते पाहे स्वतःस भाचीत पुन्हा शोडषा बनते नसे अपेक्षा वाट्याची मोठेपण तरी गाते उरी गोठे समानता गीत माहेरचे गाते असे चैतन्य माहेर झरा सुखाचा माहेर पुसे दुखले खुपले करी प्रेमाचा आहेर अर्चना मुरूगकर

लवंगलता मात्रावृत्त

इमेज
  छंदोरचना  लवंगलता मात्रावृत्त 8-8-8-4 काय नेमके आहे मनात माझ्या विश्व वेगळे दडून बसले  आहे सजवत फुलवत गोंजारत मी त्याला जपते आहे लोकांसाठी वेडी ठरते अजब अनोखी बनते कळतच नाही मनात माझ्या काय   नेमके आहे पेलत पेलत खोटी नाती हासत जगते आहे ना पटण्याऱ्या मुद्द्यांवरती मनात बोलत आहे होतो आतच अग्नी मोठा जाळत जातो सारे एक हुंदका अन एकाकीपण आत साठले आहे समाज समाज ज्याच्या साठी जगणे माझे आहे निर्णय माझे बदलत जाण्या बनला कारण आहे मदत मागता तटस्थ बनुनी अंतर  राखत जातो विसंगतींना उत्तर नसते रडणे हाती आहे मेळ साधता परंपरांचा आयुष्य पुढेच नेले नव्या पिढीचा वेग पकडुनी अजून बदलत आहे आस वाढता ओझे वाढे  त्यातच दबते आहे गात्रे थकता मनही थकते तरी उभारी आहे.  अर्चना मुरूगकर.

पाऊस

इमेज
  वृत्तबद्ध -कविता अननज्वाला होई लगबग तप्त उकाडा वैशाखाचा दाहत जाई प्रतिक्षेत वर बघती सारे तगमग होई अवचित येती मेघ सावळे भरून सारे काळोखाने झाकत जाती क्षणात सारे हळू येतसे थंड लहर ती मग वाऱ्याची तुटे साखळी या वाऱ्याने कृष्ण ढगांची सुखद गारवा क्षणात पसरे जाई तगमग थेंब टपोरे टपटप पडती होई लगबग शेतकरी मग सुखात न्हाई सुख स्वप्नांनी मृद्गंधाच्या नवलाईने गंधित धरणी झाडे पाने प्राणी न्हाती आनंदाने चराचरी हे भाव नाचरे वर्षावाने अर्चना मुरूगकर

(हझल) लवंगलता मात्रावृत्त

इमेज
 हझल लवंगलता मात्रावृत्त ८-८-८--४ गेंडे होते वाकून उभे मिरवणूक बघ झाली लाथा बसता कळले मजला निवडणूक बघ झाली जेथे तेथे सांगत होते अभ्यासाची महती  बैल खळ्याशी फिरतो नुसता फसवणूक बघ झाली मेडल बिल्ले ढेकी मोठी नोकर भरती झाली नंदीबैला टाय घालुनी करमणूक बघ झाली मुकी राहुनी निती नियमा निमूट साहत होती भित्री वेडी समाज म्हणतो पिळवणूक बघ झाली म्यूट अनम्यूट कळतच नाही आजोबांना अजून एल. के. जी. ची नात पहाते हसवणूक बघ झाली उडी मारतो गडगड हसतो विदूषक दिसे भारी रडू दडवणे सवयच बनली वागणूक बघ झाली अर्चना मुरूगकर

*गझलवृत्त -व्योमगंगा*

इमेज
 *गझलवृत्त -व्योमगंगा* लगावली-गालगागा गालगागा गालगागा गालगागा मी अशी गुंतून जाते आरशांशी बोलताना मी कधी हरवून जाते आठवांशी बोलताना साद ऐकू येत आहे सांजवेळी साजणाची मी सदा व्याकूळ होते वेदनांशी बोलताना प्रेमपत्रे वाचताना रोखलेले श्वास होते आसवांचे पाट झाले अक्षरांशी बोलताना सोडलेली आस आता भेटण्याची बोलण्याची दोर सारे कापलेले वास्तवांशी बोलताना का नशीबा वंचना ही भंगलेल्या अंतरांची भांडताना मूक होते देवतांशी बोलताना ©©अर्चना मुरूगकर

मोगरा

इमेज
    शुक्रवार:२/७/२१  *काव्य प्रकार: अष्टाक्षरी* *विषय:-  फूल* * शिर्षक*- *शांत बहरे मोगरा*  रंग मोत्याचा पांढरा खुले राजस नखरा कंच हिरव्या पानात शांत बहरे मोगरा मन गंधित हसरे जसे अत्तर पसरे फुले कोमल वेचता पुन्हा जोमाने बहरे वेणी केसात माळता मनी मोगरा गुंफती रूपा रूपाला भेटता वाढे सौंदर्य प्रचिती साजणाच्या आठवाने मन वेडे पिसे व्हावे सुवासिक ओढ याची फूल ओंजळीत घ्यावे ©अर्चना मुरूगकर

आयुष्याची भरली शाळा..

इमेज
*आयुष्याची भरली शाळा* आयुष्याची भरली शाळा खडतर गणिते दिसू लागली कष्ट मागते नवी पायरी विश्वासाने चढते छकुली वणवण फिरती आईबाबा पोट रिकामे भरण्यासाठी सगुणा रांधत शिकते आहे भविष्य सुखाचे घडण्यासाठी राबराबुनी मिळतो तुकडा चवच आगळी सुंदर न्यारी शिकण्यासाठी नसती सुविधा प्रत्यक्ष शारदा बसे भूवरी पोट उपाशी जाणिव देते भोवतालच्या खऱ्या जगाची बळकट बनती कोमल खांदे धुरा पेलत मग कामाची अर्चना मुरूगकर तळेगाव दाभाडे