आरसा

 असा असावा आरसा

वाढे मनाचा उत्साह

कधी नयनी अंजन

हरे मनाचा उत्साह.


मृगा दिसे मृगजळ

ससा दिसावा ससुल्या 

लांडग्याला धूर्तपणा

वाघोबाला वाकुल्या


बैला दिसे बैलगाडी

गाढवाला बावळट

गाई वासरू हंबरी

उंटा दिसे वाळवंट.


पोपटाला पोपटपंची

घार चपळच भासे 

पिले पाही काळजीने

रूप आगळेच भासे


असा असावा आरसा

दिसो सत्याचा चेहरा

गुण दिसो ज्याचे त्याला

करी जीवना इशारा


रमेश मुरुगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा