नेटफाॅरवर्डस आणि घरातील स्वयंघोषित तज्ञ खरंतर आता हे मेसेजेस खूप सवयीचे झाले आहेत.स्मरणशक्ती शाबूत असणा-यांना ते पाहिल्याबरोबर आठवतात. नेटवर तर ज्याला ज्याच्यात रस त्याचे अल्गोरिदम बनते,तेच ते पाहणे आणि तज्ञ बनणे ही फुकटची सोय उपलब्ध झाली आहे. नृत्य,जेवण,खरेदी,आरोग्य,सिनेमा,गेम्स,पाॅर्न,फॅशन्स,शेअरमार्केट,इतकंच कशाला चालू राजकीय घडामोडीतील एखाद्या गोष्टींचे रील्स याला काही मर्यादा नाही ,एवढा मोठा डेटा उपलब्ध होत असतो. 'मी नाही त्यातला' असे म्हणत सावकाश लहानमोठा प्रत्येकजण सोशल मिडिया,आॅनलाईन खरेदी यात गुंतलेला आहेच.जे प्रकर्षाने टाळतात किंवा वयामुळे जमत नाही त्यांना 'फोमो' असतोच.कारण कुणीही याचा संदर्भ देतो,तेव्हा मागासलेपण वाटते. सल्ले देण्याचा अबाधित हक्क असणाऱ्या वृद्धांनाच आता सल्ले ऐकण्याची वेळ आली आहे. मध्ये एक उदाहरण पाहिले की एका सासूबाईंनी गौरीच्या वेळी सुनेला हातचे राखून मार्गदर्शन केले,आता ही ताट कशी वाढणार परीक्षा पाहत होत्या,पण तिने छान केले सगळे, नेटवरून पाहिले होते.असा फायदा पण होतो.त्यातल्या त्यात आरोग्य आणि खाद्यपदार्थ हे जवळचे विषय.काही...