चिमणी


 चिऊ

चिऊ चिऊ चिमणी 

उडत अंगणात येते  

चिवचिव गोड गोड

गोष्टी कानात सांगते 


हिरव्यागार फांदीवर

बसून झोके घेते 

मी जवळ जाताच

लगेच उडून जाते


भुर्र भुर्र भुर्र भुर्र‌‌‌ 

उगाच उडत असते

खूप उन्हात दुपारी 

पानांत दडून बसते


आजी ठेवते बाऊल

गार निर्मळ पाण्याचा

पाणी उडवत चिऊ

आनंद घेते पोहण्याचा 


गप्पा गोड चिऊच्या

आवडतात मला फार  

आवाज तिचा गोड ऐकून

मन होते हिरवेगार 


अर्चना मुरुगकर 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेख मकरसंक्रांत

साहित्यातील राजकारण

हरकत नाही