पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*

इमेज
 *रविवार लेख उपक्रम* दि.१५/१/२०२३ *मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन* *मकरसंक्रांत: धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन*      आपले सगळेच सण उत्सव हे निसर्ग, शेतीप्रधान जीवनपद्धती, मौसमी फळे -भाज्या यांच्याशी निगडीत आहेत. पौष महिन्यात रथसप्तमीपर्यंत  होणारी आदित्य राणूबाईची पूजा, दर रविवारी केली जायची. त्याच्या कथा ऐकल्या जात असत.  त्यातून मिळणारा संदेश उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.. हे कानात घुमत असते. या रविवारची,रथसप्तमी ची पूजा, रांगोळीने चंदनाच्या पाटावर सूर्य, रथ रेखाटणे अशी होत असे. यातून प्रिंट मिडिया खूप प्रगत नसताना भौगोलिक ज्ञान,जीवन यांची सांगड  संस्कृतीच्या माध्यमातून  पुढच्या पिढ्यांकडे गेली.  बिब्याची फुले, करडईचे फुले यांना महत्व असायचे. बिब्याची फुले वातहारक आहेत. प्रत्येक देवतांच्या आवडत्या फुलांमध्ये काही वैशिष्ट्ये दडली आहेत. पिवळे, तपकिरी असे हे करडई फूल सूर्याच्या तेजस्वी पणाचे द्योतक आहे.  भोगविडे,संक्रांत, कर आणि महिनाभर चालणारे हळदीकुंकू असे उत्सवी बायकांच्या गोटातले वातावरण  संक्रांती निमित्ताने चालू असायचे. भोगी