पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मखाना (कमल बीज), माहिती आणि उपयुक्तता.

इमेज
  मखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राकृतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. या बियांना खास मंद सुगंध असतो.  भारतात पूर्वापार खाल्ला जाणारा मखाना म्हणजे कमळाचं बी पुन्हा एकदा डाएटमध्ये सहभागी झाला आहे. मखाना खाल्यामुळे आरोग्य चांगलं राहतच पण त्याचबरोबर इतर अनेक फायदे होतात.  मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात. मधुमेहावर जर तुम्ही रोज चारच मखाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डायबेटिस कमी होतो.   दैनिक आहारांत किमान २५ ग्रँम मखाना रोज खायला हवे. बाळंतिणीला पौष्टिक आहार म्हणून खिर, लाडु, वैगेरे स्वरूपात खायला देतात. वजन कमी करण्यासाठी आहे, त्यांच्याकरता मखाने खूपच फायदेशीर आहे. कारण याने पोट लवकर भरते.    मखान्याच्या सेवनाने अनिद्रा, अस्वस्थ वाटणे, दूर होते. मखान्यात पोटँशिअम भरपूर मात्रेत असल्याने रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाबावर अंकुश राहतो. यात सोडिअम अत्यल्प प्रमाणांत असते. मखाना ग्लूटेन, मुक्त आहे, व प्रोटिन युक्त आहे. ग्लायसेनिल इंडेक्स अतिशय कमी असल्याने याचे सेवन मधुमेह रुग

थंडीतला खुराक (हळीव)

इमेज
  थंडीतला खुराक  🥣🥣 हिवाळा आला की काही खास रेसिपीज आठवू लागतात. अळीवाचे काही पदार्थ दरवर्षी केले जातात. जिभेवरची चव पुन्हा मनात रेंगाळते. पुढील पिढीला चवींची, पदार्थांची ओळख होण्यासाठी काही पदार्थ नक्की घरी बनवावेत. अळीवाची खीर यापैकीच एक!  अहाळीव  (हळीव, अळीव) (गार्डन क्रेस सीड्‌स - garden cress seeds) - Lepidium sativum, हळिवाला हिंदीत हलीम म्हणतात. हे एक अत्यंत पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवांत तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न आहे. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळीवांत आहेत. हळीव किंवा अळीव म्हणून ओळखिली जाणारी तेलबिया देणारी ही भारतात उगवणारी, मूळ्ची इथियोपियातली एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.  हळीव हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील ॲंटिऑक्‍सिडंट्‌स व रक्‍तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्‍त ठरते.  बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. अळीवामुळे अंगकाठी भरायला मदत होते. अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळीव

चारोळ्या-भाग -2

इमेज
  चार ओळी (four lines)मध्ये लिहल्या गेलेल्या कविता म्हणजे चारोळी.  चारोळी काव्याचा आकृतिबंध नावांतच सामावलाआहे.    चारोळी काव्यप्रकारात २ऱ्या व ४ थ्या ओळीत यमक साधल्या जाते,त्याचबरोबर काही वेळा सर्वच ओळीत यमक साधल्या जाते.    सहज तुलना केली तर,स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या चारोळी या पदार्थांशी नाव व गुणातही सार्धम्य साधल्या गेल्याचे दिसते.त्यामुळे चारोळी कविता म्हणजे अल्पाक्षरी, छोटा आकृतिबंध व त्याचबरोबर चारोळी या पदार्थासारखा पौष्टिक, गुणवर्धक व मनाला शांती देणारा असे म्हणण्याचा मोह होतो.      चारोळीत कवी एखादा प्रसंग,विषय मांडतात,सारांश सांगतात व ती पूर्ण कविता असते.मी इथे काही चित्र चारोळ्या पोस्ट करत आहे.  धन्यवााद🙏

हसे इंद्रावती

इमेज
 निरभ्र निळे वरती अंबर उमटे चित्र शांत पाण्यावर तरल तरंगांतूनी तरंग उमटती निर्मळ पात्रातूनी हसे इंद्रावती.  थोडीशी झाडी, काठही सुंदर रेशमी  झबल्याची हिरवी झालर तपकिरी मृदेचे कोंदण सभोवार नयन  खिळवती दृश्य मनोहर.  ओले वारे ल्यावे साऱ्यांनी चिंब भिजावे निसर्ग प्रेमाने करावे निसर्गरक्षण हर्षभराने अनुभवावे उद्या हेच लेकराने.  मानव असे औट घटकेचा निसर्ग अमृत अनंतकाळाचे करावा जतन ठेवा निसर्गाचा करी वापर मनुजा चातूर्याचा.

गणेश चारोळ्या भाग-4

इमेज
      नवीनच बनलेल्या ' ब्लॉग लेखन 'व्हाट्सएप ग्रुपवर सोनाली देवळेकर मॅडमशी ओळख झाली. Morning moraya या मथळ्याखाली रोज गशाचे नवे चित्र येत असे. त्यावर रोज नवी चारोळी लिहून त्या पाठवत असत. आम्हालाही लिहिण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी ही चित्रे ग्रूपवर पाठवण्यास सुरूवात केली. हा अद्भुत योग त्यांच्यामुळेच जुळून आला.अगदी 10-15 चारोळ्या सकाळीच 9 ते 10 वाजेपर्यंत वाचायला मिळतात.       प्रत्येकाला बाप्पा आपल्या दृष्टी प्रमाणेच दिसतो. लिखाणाची ढबही वेगवेगळी. भाव तोच, भक्ती तिच शब्दांकन मात्र वेगवेगळे. ना कसली स्पर्धा, ना कोणते बंधन! रोज सकाळी शब्दसुमनांनी बाप्पाची पूजा! नवलेखकांना विद्याधीश गणेशाचा जणू आशीर्वादच हा.         यामुळे चित्र कवितांचा नवा छंदच जडला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ठाण्यातील कलाकार श्री. दिलीप वैती सर ही चित्रे पाठवतात. त्यांच्या व्यस्त दिनचर्येत नवी जबाबदारीच.या सगळया त्या दिवशीच्या कवितांचे ते पी. डी. एफ. ही बनवूनही पाठवतात.त्यांनी पाठवलेली चित्रे पाहून आम्ही अगदी स्तिमित होऊन जातो.केवढी रूपे बाप्पाची! या चित्रांसाठी वैती सरांचे व विश्वविनायक ग्रूपचे मानावे त