थंडीतला खुराक (हळीव)
थंडीतला खुराक
🥣🥣
हिवाळा आला की काही खास रेसिपीज आठवू लागतात. अळीवाचे काही पदार्थ दरवर्षी केले जातात. जिभेवरची चव पुन्हा मनात रेंगाळते. पुढील पिढीला चवींची, पदार्थांची
ओळख होण्यासाठी काही पदार्थ नक्की घरी बनवावेत. अळीवाची खीर यापैकीच एक!
अहाळीव (हळीव, अळीव)
(गार्डन क्रेस सीड्स - garden cress seeds) - Lepidium sativum,
हळिवाला हिंदीत हलीम म्हणतात.
हे एक अत्यंत पौष्टिक असे तेल-बी आहे. १०० ग्रॅम हळिवांत तब्बल १०० मिलिग्रॅम आयर्न आहे. लोह, कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व व टोकोफेरॉक हे पोषक घटक हळीवांत आहेत.
हळीव किंवा अळीव म्हणून ओळखिली जाणारी तेलबिया देणारी ही भारतात उगवणारी, मूळ्ची इथियोपियातली एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
हळीव हे रजःस्राव नियमित करण्यात मदत करते, तसेच त्यातील ॲंटिऑक्सिडंट्स व रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्त ठरते. बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची पूर्वापार पद्धत आपल्याकडे आहे. अळीवामुळे अंगकाठी भरायला मदत होते.
अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत.
हळीवात म्युसिलेज सारखा चिकट पदार्थ अधिक प्रमाणात असल्या मूल्ये बद्धकोष्ठ, मधुमेह, कोलेस्टेरॉल या साठी उपयुक्त आहे.
हळिवांतील चिकट गुणधर्मामुळे मलाविरोधाची तक्रार कमी करण्यासाठी यांचा वापर करता येतो.
हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.
आळीवाची खीर लहान मुलांना तसेच अशक्त माणसांना द्यावी.त्यामुळे शक्ती वाढते.
वाताने कंबर दुखत असल्यास आळीवाची खीर खाल्ल्याने फायदा होतो.
अशाप्रकारे आळीव हे अत्यंत उपयुक्त आहे.
हळीवाच्या बिया भाजून विविध अन्नपदार्थात अंतर्भूत करून आहारात समाविष्ट करता येऊ शकते. अळिवाच्या बिया भाजून शेंगदाणा, तीळ यांसोबत चिक्की बनवून खाल्यास फायदेशीर ठरेल.
हळीवाचे लाडू हा एक पारंपरिक अन्नपदार्थ आहे.
शिवाय विविध बेकरी पदार्थात अळीव समाविष्ट करणे, अशा पदार्थांचे मूल्यवर्धन करण्यास फायद्याचे ठरेल.
डायरिया, कफ, अस्थमा अशा आजारांवर अळीव उपयुक्त आहे. पोटातील वायू दूर करण्यास, डाययुरेटिक,शक्तिवर्धक असे अनेक गुणधर्म अळिवास आहेत.
बाळंत स्त्रियांमधील दुधाचे प्रमाण वाढवण्यास अळीव आणि अळिवाचे पदार्थ फायदेशीर ठरल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे.
हळीवातील लोहामुळे रोग्यातील हिमोग्लोबीन लवकर वाढण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदोषामुळे होणारे त्वचारोग, अनेमिया या सारख्या व्याधींसाठी अळीव सेवन उपयुक्त ठरू शकते.
हळीव गर्भसंयोजक असल्यामुळे गर्भवती महिलांनी अळिवाचे सेवन करू नये.
अत्यंत सोपी अशी हळीवाची खीर बनवण्याची
पाककृती पुढील व्हिडिओ मध्ये आहे. या व्हिडिओची
लिंक खाली दिली आहे. हा व्हिडिओ जरूर पहावा.
( Click to see the quick recipe )
खूप छान लिहिलंय!
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाउपयुक्त माहिती..छान लिहीलीय्..
उत्तर द्याहटवाउपयुक्त माहिती..छान लिहीलीय्..
उत्तर द्याहटवाकृती जी ---- तुमच्या व्यासंगातून तुम्ही दिलेली माहिती तुमच्या व्यसंगाची फलश्रुती आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते ;
उत्तर द्याहटवाहार्दिक अभिनंदन
नी
पुढील वाटचालीस
मनापासून शुभेच्छा-- ----!
सुभाष तोंडोळकर/औरंगाबाद
२५/११/२०
धन्यवाद सर. 🙏
हटवाछान माहिती मिळाली आणि योग्य महिन्यात
उत्तर द्याहटवा