हायकू
हायकू
'हायकू' महणजे तिन ओळीतील बंदिस्त लिखान. ती खूप ओळींची कविता नाही की अनेक प्रसंगांची कादंबरी.
'एक क्षण'.... त्यावेळचे चित्र आणि त्यामुळे कवीच्या
मनात उमटलेल्या उर्मी. हायकू ही क्षणिका आहे.. अनुभवाच्या चरम अनुभवाची.
हे हायकू 'चित्र हायकू' च्या स्वरूपात इथे पोस्ट करत आहे.
*काव्य म्हणजे काय?
*चहा हे फक्त पेय नाही तर अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. मित्र मैत्रिणीं सोबत घेतला तर जास्तच आनंददायी आहे.
*प्रभातसमयीचे दृश्य सर्वांच्या मनाला भावते. सूर्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो. कुठे सडा, रांगोळी तर कुठे
पक्ष्यांची किलबिल.
*'नंदादीप' ऐकूनच पावित्र्य जाणवते. मंदिरात, देवघरात
शांत तेवत असतो. मनाला स्मरणाने ही आनंद देतो.
* बालपणात आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने मनात असतात.
परंतु अभ्यास, टक्केवारी यांच्या दडपणाखाली स्वतंत्र जगण्याचे
विचार नाहिसे होतात. पुढे ती उमेद हरवते.
*अनेक मुली स्त्रिया फेसबुकवरच्या प्रियकराच्या जाळ्यात फसलेले पाहतो. काही वेळा त्यांना आर्थिक त्रास झाल्याच्या बातम्याही वाचतो. तर कित्येक जण फेसबुकवर चांगले मित्र असतात पण प्रत्यक्षात काहीच मदत करत नाहीत.
*सामाजिक विषमतेमुळे आजही मुली अनेक स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत.
*वाचनाने ज्ञान मिळते आणि विचारांनाही खाद्य मिळते.
* काहीवेेेेळा माणूस कसेही यश मिळवतो. इतरांना त्रास देवूनही पुढे जातो. प्रसंगी पशूइतका क्रूर बनतो, जीवही घेतो.
*स्त्रिया-मुलींवर अनेकवेळा समाजात अन्याय होतानाआपण पाहतो. यावेळी माणूसकी शिल्लक आहे का? असाच प्रश्न पडतो.
* कोरोनामुळे जगात 'न भुतो न भविष्यति'असे दृृृृृश्य दिसले.
*लाॅकडाऊन ही सुद्धा कधीही न अनुभवलेली घटना होती.
*शिक्षण म्हणजे मनाला लागणारे वळण आहे.
*कोमल प्राजक्त फुलाच्या आणि त्याच्या सुगंधाच्या प्रेमात न पडणारा माणूस विरळाच!
*या शांंत अश्या आभाळ आणि पाण्याकडे पाहून आपणही क्षणभर थांबतो .निसर्गाचाआनंद घेतो.
*कधी कधी स्वतःचे अवलोकन न करता माणूस जगाला नावे
ठेवतो.
*रांगोळी हे एक संस्कृती संवर्धन आणि सृजनाचे कार्य आहे. जीवनातील अनेक रंगाचे दर्शन.
धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा