पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लॉकडाउन आणि मी

इमेज
       लॉकडाउन आणि मी   अचानक लॉकडाउन लागले आणि खरेच वाटेना की आपण काही काम न करता घरातच आहोत. करोना विषयीच्या बातम्या , भारताचा कितवा नंबर , कोणत्या सेलिब्रेटीला , नेत्याला झाला , सगळे पुन्हा पुन्हा टीव्हीवर पहायचे . घरातला बदल म्हणजे कामवाली नाही . काय काय गमतीशीर व्हिडिओज आणि मीम्स यावर येत होते . आणि चॅलेंजेस ! नथीच्या फोटोंचे , लग्नाच्या फोटोंचे , साडीचे , वेस्टर्न कॉस्च्युम्सचे .        यानंतर झूम मिटींगस् . व्हिडिओ कॉल्स आणि फॅमिली मिटींगस् . सगळेच ऑनलाइन . जो तो ऑनलाइन . शाळा कॉलेज ऑनलाइन . त्याच्याही गमती - जमती , नाविन्य ! जुन्या लोकांचे अडखळत शिकणे तर नव्या मुलांचे लिलया वावरणे चालू झाले . वर्क फ्रॉम होम आणि त्यातील गमतीजमती आणि त्रास चालूच होते . काही बायकांना नवरा व त्याचा मोबाईल घरीच असल्याने , नवऱ्याने कष्टाने लपवलेल्या गुप्त कहाण्या सहजगत्या समजल्या . अशीच कोण्या बायकोबद्दलची माहिती मिळाल्यानंतर तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूनी हल्ला केला . अशीही बातमी वाचण्यातआली . लॉकडाउन मुळ

THOUGHTS

इमेज