पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोसळती स्वप्ने

इमेज
कोसळती स्वप्ने  लोकशाही भारत माझा  आजही कागदावर राहिला  धार्मिक तेढ समाजगुंता   रोज वाढतच राहिला.  हौतात्म्य वीरांचे कर्तव्य,  रोजची दिवाळी सीमेवर वाट्टेल त्यासाठी भांडती स्वार्थी नेते माईकवर भ्रष्टाचार शिष्टाचार मानून वाढवावेत उद्योग स्वत:चे  यात साथ देईल तोच नेता आणि सरकार त्याच पक्षाचे जाणत्या शिकलेल्यांना कुंपणे केव्हाच झाली अंथरुणे छोटी मुलांचे शिक्षण, छोटेसे घर धावत रहाती मिळावाया रोटी शेतकरी कधीचाच हरला हरतोय आता तरूण आमचा आदर्श राष्ट्राची कोसळती स्वप्ने रस्ता धरतोय परदेशाचा.  अर्चना मुरूगकर.

माझे हायकू भाग-३(विषय-प्रेम)

इमेज
  🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

माझे हायकू (भाग-२)

इमेज
    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 नकळत नजरांची भेट होते. मनेही नकळत जुळतात.  हे सगळे त्या नजरांचा नजराणा, नजरांचाच गुन्हा. 🤩😇👁👁👀 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼         तरीही ही नकळत होणाारी नजरानजर दोन मनांना मात्र     जोडते.      कुठल्याही इतर सोपस्कारांशिवाय. अगदी सहजतेने.      गुपचूप . आकर्षणांची स्पंदने मात्र हृदयात धडधडू लागतात.   🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼       पहिल्या प्रेमाच्या आठवणी. नेहमी स्मृतीत राहणाऱ्या.         कधी मिळते तर कधी दुरावते.आठवणी मात्र अलवार       जपलेल्या.मन त्या आठवणींमध्ये क्षणभर तरी नक्कीच      गुंतते.    🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼      प्रेमांची भाषा ही प्रेमिकांनाच समजणारी आहे.       इतरांनी अन्वयार्थ लावून ती समजणारी नाही.       समाजाचे प्रत्येक ठोकताळे लागू पडतीलच असे नाही.  🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺   प्रेमीजनांना एकमेकांच्या सहवासाची ओढ असते.    एकमेकांच्या भेटीने, आठवणीने, दिसण्याने जो आनंद   आहे तो इतर कशातच नाही.  🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼    प्रेमभ

(अष्टाक्षरी कविता ) आस प्रेमाची

इमेज
  आस प्रेमाची जीव जीवाला भेटती आस असे मिलनाची येई मोदाला भरती  भेट नदी सागराची आस नित्यची प्रेमाची असे आतल्या मनाची प्रीत असो पन्नाशीची किंवा कोवळ्या विशीची.  रीत नकळे जगाची  नच काळाची वेळाची खरी प्रचिती प्रेमाची  रंगी रंगल्या रंगाची.  फित आठवे स्मृतीची  गाली फुले गुलाबाची दाही विरह जीवाला कळ उरी वेदनेची.    फक्त मनाचा व्यापार नाही गरज नात्यांचीआ आस वीजेला भुईची  मधुकरा सुमनांची.  अर्चना मुरूगकर.

वैज्ञानिक संत

इमेज
  वैज्ञानिक संत झाडू मडके हातात बाबा गावोगावी फिरे साधे संवाद कीर्तनी करी गाव स्वच्छ सारे.  खरा वैज्ञानिक संत अंधश्रद्ध समाजाचा परखड उपदेश संत गाडगे बाबांचा.  रीन कोणी काढू नका जादूटोणा मानू नका द्यावे शिक्षण मुलांना देव माना माणसांना सुधारक समाजाचा व्यवहार सचोटीचा नदी घाट, धर्मशाळा रूग्णालये निर्मिकाचा.  घ्यावा सुज्ञान जणांनी वसा समाज कार्याचा थांबलेल्या विकासाचा स्वच्छतेचा, शिक्षणाचा.  अर्चना मुरूगकर. 

प्रेम (मधुसिंधू काव्यप्रकार)

इमेज
 प्रेम तुझ्याशी प्रेम  स्पंदन मनाचे भाव अंतरीचे ओढ अनाम.  संदेश देते मनाच्या शाईने लगेच घाईने उरी भेटते.  दाखवी रस प्रत्येक बाबीत दोघांच्या लयीत पेहरावात.  नको अबोला विरहाचे भय धरूनी संशय खंड प्रितीला.  सांज सावळी आठव मनात मनाच्या डोहात कातरवेळी.  अर्चना मुरूगकर. 

काव्यांजली चारोळी..विषय -काव्य

इमेज
  काव्यांजली चारोळी विषय -काव्य 📝काव्यलेखन कविता लेखन मनाच्या लयीचे अवलोकन अंतरंग जाणून आलेखन. 📝रचना रचना कवितेची मन उतरे कागदावर भावना हळूवार हृदयाची. 📝 भावतरंग मनाचे अंतरंग बनून येई कविता सोडवण्या गुंता भावतरंग.  📝चंचल मन कविता चंचलतेची असे तरूण वयाची उर्जा, प्रेमाची फुलपाखराची. 📝बोबडे बोल नवकवीचे कवन अवखळ, सरळ,मुक्त. भावनाच फक्त विनानियमन.

काव्यांजली चारोळी( विषय-प्रेम)

इमेज
  काव्यांजली चारोळी 🌹प्रेम माझे प्रेम पाखरू होऊन भेटते तुझ्या मनाशी क्षणात.  🌹कातळ भेटावे कशाला नसे आशा प्रेमाची मनाच्या प्रितीची कातळाला.  🌹खोटे बहाणे बहाणे खोटेच आणा भाका शपथांचे न भेटण्याचे प्रेमिकांचे 🌹विरह दुरावा देई आठव त्या प्रेमाचा कढ भेटीचा  विरहात.  🌹अनुराग लटका राग मनी काळजी,जिव्हाळा. खोटा सोहळा अनुराग.  🌹मनोमीलन पूर्तता प्रेमाची नसे फक्त भेटीत सर्वस्व देण्यात मनोमीलनात.  अर्चना मुरूगकर. 

संवाद (कविता)

इमेज
 

जीवाची भेट (कविता)

इमेज
  जीवाची भेट वेडा बोलतो स्वप्नात   पुन्हा एकदा मित्रांशी खूप हसतो गप्पांत  झडतात हास्य राशी.  सत्यात जाणतो मग हरवले  मागे सारे  जरी  हजार कारणे झाले भूतकाळ सारे.    अहंकार आड येई कधी स्तर समाजात जरी सुदामा-श्रीकृष्ण होते सारे पुराणात.  वर्तमान गुंतलेला असे कामाच्या घाईत बंधनाच्या चाकोरीत सहकारी मेळाव्यात.  वेळ काढावा थोडासा द्यावा दिलासा मनाला  यंत्रवत जीवनात भेटा आपल्या जीवाला.  अर्चना मुरूगकर.

अबोल प्रीत(कविता)

इमेज
 अबोल प्रीत प्रितीच्या फुलाने सुगंधित व्हावे जराशी उधाने मनाची पहावी जगाला नसावा सुगावा जराही. मनाला मनाची धडाडी कळावी. तुला लागले की मला दु:ख व्हावे अबोल्या त ही भाव सारे कळावे मुक्या भावनांचे शहारे फुलावे मनासी मनाचे धुमारे मिळावे. नसे प्रीत सारी असे मीलनात जगा दावण्या साथ सारी जगात निराळेच गाणे असावे गळयात कळावी खुशाली सख्याची जगात उगा लाजणे आठवांच्या महाली फुलांच्या झुल्याशी फुकाचे झुलावे लगामे नसावी कुणाची कुणाला  प्रितीला,   दिलाच्या, दिलाने, जपावे.     अर्चना मुरूगकर

बालपण (कविता)

इमेज
 बालपण असे नित्य मजेचे संस्काराचे, प्रेमळतेचे हट्ट पुरवितीआई बाबा काका मामा लाडक्यांचे.  भावंडांची प्रेमळ माया भांडण मस्ती, नंतर शिक्षा आंबट गोड चवीचे जीवन सहज मिळावी समाज दिक्षा.  मातुलघरची दंगामस्ती लग्नघराची धमाल मस्ती मनात राही अवीट गोडी किल्मिष सारे दूरच असती.  सखेसोबती निव्वळ सोबत गप्पांसंगे चालत-बोलत जीवन सारे आनंदाचे प्रत्येकाच्या बालपणीचे.  अर्चना मरूगकर

मेतकूट

इमेज
           कन्नडमधील 'मेंथे हिट्टूचा' अर्थ  “मेथी पावडर” असतो. यापासून मेतकूट हा शब्द वापरात आला असावा. पण अहो थांबा .. तुम्ही नाक मुरडू नका. ही भुकटी अजिबात कडू नाही… खरं तर भाजलेल्या मेथी पावडरला एक वेगळाच सुगंध असतो.     "मेतकूट" हा मराठमोळा चविष्ठ पदार्थ !! मऊभात,साजूक तूप आणि वरुन मेतकूट आहः !! याची सर तर कशालाच नाही.     मेतकूट हा शब्द 'मेतकूट जमणे' या वाक्प्रचारातच ऐकलेला होता. तो खाद्यपदार्थ ही आहे. त्यामुळे मेतकूट या शब्दाला एक विनोदी छटा माझ्या लेखी आहे. त्याचा अर्थ लफडे, भानगड, प्रेम असाही आहे. त्या विषयी जे वाचले त्यावरून 'मेतकूट भात' हेच फक्त एक दुजे के लिये आहेत असे लक्षात आले.        जेवणाच्या सुरुवातीच्या काळात लहान मुलांना ते दिले जाते म्हणून ते मसालेदारही  नसते. तसेच भाताबरोबर वरण करण्याच्या कंटाळ्याला तो   पर्याय असावा ,असेही वाटते.  पावसाळ्यात रात्री नुकता कुकर मधून काढलेला                गरमागरम वाफाळता भात, त्यावर तुपाची धार, मीठ,     लिंबू    आणि मेतकूट...अहाहा स्वर्ग सुख.... मेतकुटात कांदा, कोथिंबीर घालून थालीपीठ पण छान होते. आ