(अष्टाक्षरी कविता ) आस प्रेमाची

 



आस प्रेमाची


जीव जीवाला भेटती

आस असे मिलनाची

येई मोदाला भरती 

भेट नदी सागराची


आस नित्यची प्रेमाची

असे आतल्या मनाची

प्रीत असो पन्नाशीची

किंवा कोवळ्या विशीची. 


रीत नकळे जगाची 

नच काळाची वेळाची

खरी प्रचिती प्रेमाची 

रंगी रंगल्या रंगाची. 


फित आठवे स्मृतीची 

गाली फुले गुलाबाची

दाही विरह जीवाला

कळ उरी वेदनेची. 

 

फक्त मनाचा व्यापार

नाही गरज नात्यांचीआ

आस वीजेला भुईची

 मधुकरा सुमनांची. 


अर्चना मुरूगकर.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा