पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुरणपोळी

इमेज
पुरणपोळी पुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे . देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष सणाच्या निमित्ताने दाखवला जातो . होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वा चा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्ताऱ पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ.  लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते.  धार्मिक  पंरपंरत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .                                        (

अष्टविनायक दर्शन

इमेज
अष्टविनायक   दर्शन   गणपती हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे . आपले इच्छित कार्य सफल व्हावे यासाठी सर्वप्रथम गणपतीचे पूजन करून त्याचे आशीर्वाद घेतले जातात . अष्टविनायक ही स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे आहेत . ही आठही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थित आहेत . आजच्या धावपळीच्या आयुष्यात या आठ गणपतीच्या मंदिरांना भेट देण्याने मनाला शांत   वाटते .   अष्टविनायक हा शब्द ‘ अष्ट ’ आणि ‘ विनायक ’ या दोन शब्दांना जोडून तयार झालेला आहे . अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय दैवत गणपती होय . कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते . कारण विद्येचे दैवत असलेला हा गणपती सर्व विघ्नांना दूर करून समृद्धी प्रदान करतो . ही मंदिरे निसर्गरम्य अशा ठिकाणी वसलेली आहेत . ही आठही मंदिरांची स्थापत्यकला अतिशय उत्कृष्ठ असून ती मनाला सुखावह वाटतात .   अष्टविनायकाची तीर्थयात्रा म्हणजे पुणे आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात वसलेल्या आठ प्राचीन पवित्र गणपती

कृष्णकमळ

इमेज
कृष्णकमळ (https://images.app.goo.gl/NK74icRxKccHExua8) Wow! माझ्या बहिणीने व्हाट्सअप ग्रुप वर पाठवलेले तिच्या बागेतले कृष्णकमळ   पाहून मला खूप प्रसन्न   वाटले . तिला झालेला आनंदही जाणवला . बालपणीच्या खूप आठवणी जाग्या झाल्या . हे पण आठवले कीआमच्या कॉलेजच्या बॉटनी सेक्शनच्या समोरही एक वेल होती . कृष्णा सारखे नीलवर्ण असलेले व खास सुगंध असलेले हे फूल ! नाजूक पराग डंबेल सारखे आकार सगळेच काही वैशिष्ट्यपूर्ण ! जरी ही वनस्पती मूळची दक्षिणपूर्व अमेरिकेची असली तरी या फुलांचे भारतात सर्वत्र अस्तित्व आढळते .   या टेंन्ड्रील असलेल्या वेलीच्या स्वरूपात दिसतात . बागांमध्ये आणि बाल्कनीमध्ये   ही   वेल वाढवता येते . ही एक वेगाने वाढणारी दोन वर्षांपेक्षा   जास्त काळ जगणारी   वनस्पती आहे . वेल , रोपटे आणि झाड या तीनही स्वरूपांमध्ये आढळते . लाल , पिवळ्या , पांढ - या , जांभळ्या , निळ्या रंगांची ही फुले असतात . मराठीत कृष्ण कमळ , हिंदीत झुमका लता आणि इंग्रजीत पॅशन फ्लॉवर म्हणून हेओळखले जाते . विविध