कृष्णकमळ


कृष्णकमळ

Wow!माझ्या बहिणीने व्हाट्सअप ग्रुप वर पाठवलेले तिच्या बागेतले कृष्णकमळ  पाहून मला खूप प्रसन्न  वाटले. तिला झालेला आनंदही जाणवला. बालपणीच्या खूप आठवणी जाग्या झाल्या. हे पण आठवले कीआमच्या कॉलेजच्या बॉटनी सेक्शनच्या समोरही एक वेल होती.

कृष्णा सारखे नीलवर्ण असलेले खास सुगंध असलेले हे फूल !नाजूक पराग डंबेल सारखे आकार सगळेच काही वैशिष्ट्यपूर्ण!

जरी ही वनस्पती मूळची दक्षिणपूर्व अमेरिकेची असली तरी या फुलांचे भारतात सर्वत्र अस्तित्व आढळते.  या टेंन्ड्रील असलेल्या वेलीच्या स्वरूपात दिसतात.बागांमध्ये आणि बाल्कनीमध्ये  ही  वेल वाढवता येते.ही एक वेगाने वाढणारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जगणारी  वनस्पती आहे. वेल,रोपटे आणि झाड या तीनही स्वरूपांमध्ये आढळते.

लाल , पिवळ्या, पांढ-या , जांभळ्या , निळ्या रंगांची ही फुले असतात.

मराठीत कृष्ण कमळ, हिंदीत झुमका लता आणि इंग्रजीत पॅशन फ्लॉवर म्हणून हेओळखले जाते.


विविध रंगातील ब्रह्मकमळाची फुले

 

Scientific name: Passiflora

Family: Passifloraceae

Higher classification: Passion flowers

 

फुलांचे भाग

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgtXO4NbsHrZ74gP_xjMgsAD3iom69TLlIunTlWmNQ5Y6t1OsantFHe8T3mxb6_5Id0yVfvtCccBA-2xbyfL7nhD5j1UgHVKKzaehWJ20njKQUOlNKPwvnr8aP8f0c9lyuo7uRS3sZYuKs/s1600/IMG_1696+A.jpg)


  भारतात हे प्रसिद्ध आहे ते त्याच्या पौराणिक महत्त्वामुळे. ख्रिश्चन आणि हिंदू धर्मात कृष्ण कमळाचे खास महत्त्व आहेख्रिस्ती धर्मात, पॅशनफ्लॉवर हे येशूख्रिस्ताचे प्रतिक आहे.जेव्हा त्याला वधस्तंभावर खिळयांवर ठेवण्यातआले तेव्हा ख्रिस्ताच्या दु: खाचे प्रतीक आहे, कारण तीन खिळे आणि फुलाचा कोरोना ख्रिस्ताने परिधान केलेल्या काटेरी मुगुटाप्रमाणे दिसत आहेहिंदू धर्मात  फुलांचा प्रत्येक भाग काहीतरी दर्शवितोनिळे तंतु धृतराष्ट्रा (कौरव) च्या शंभर पुत्रांचे प्रतिनिधित्व करतातपाच पिवळ्या पाकळ्या पांडवांचे चित्रण करतातमध्यभागी तीन धागे ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या पवित्र त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करताततर केंद्रामध्ये असणारे  पिवळ्या रंगाचे पुंकेसर भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र दर्शविते.     

    नवीन लागवड बी, छोटी कलमे दाब कलमे यांनी करतात. या वेलीच्या वाढीस भरपूर पाणी, पाण्याचा निचरा होणारी जमीन भरपूर सूर्यप्रकाश ह्या गोष्टी आवश्यक आहेत.

     पॅशन फ्रुट (पॅ. एड्यूलिस) या निळ्या सुगंधी फुलांची जात  भारतात आणून लावली असून तिची पिवळी फळे खाद्य आहेत. त्यांचा मगज (गर) उत्तेजक आणि पौष्टिक असतो. पॅ. फेटिडा  ही लहान पांढऱ्या फुलांची जाती असून तिच्या पानांचा काढा दमा पित्तविकारावर उपयुक्त आहे. डोकेदुखीवर घेरी येणे यात पाने डोक्यास बांधतात.

बोटॅनिकल आर्ट ऑफ पॅशन फ्लावर 

https://images.app.goo.gl/PVqxdvAxyQdgofyK7)


धन्यवाद !!!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा