पुरणपोळी


पुरणपोळी

पुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष सणाच्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्ताऱ पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. 







लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धार्मिक पंरपंरत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .


                                      (https://www.pinterest.com/pin/475974254365901525/)

 

 पुरणपोळीसोबत महाराष्ट्रातल्या प्रात्येक माणसाच्या काही ना काही भावना जोडलेल्या आहेत.कुणी सांगतो “आईच्या हातची पुूरणपोळी खाण्यासाठी गावाकडे जायचयं.कुणी अव्वल सुगरणही म्हणते की मला  आईच्याच हातची पुरणपोळी आवडते.”

जेवायला बसल्यानंतर तव्यावरची गरमच वाढा म्हणणारेही आहेत.कुणाकडे साखरेची,कुणाकडे गुळाची,तर कुणाकडे दोन्ही मिळून पुरण बनवतात.पारीसाठी सपीट काढण्याचे कौतूकच वेगळे .आता मैदा,कणिक वापरली जाते.

नवीन स्वयंपाक शिकणारीला धास्ती वाटायला लावणारी तर एखादा घटकपदार्थ योग्य नसेल तर सुगरणींनाही चकमा देणारीअशी ही पुरणपोळी.

 


पुरणाचा नैवेद्य असणारी ताट प्रत्येक भागात वेगवेगळी. म्हणजे पुरणपोळीसोबत असणारे इतर पदार्थ वेगळे.


मराठवाडयात भरडा,पंचामृत,भजी तर पुण्यात बटाटयाची कोरडी भाजी,कांदा लसूण ,खोबरे असणारी कटाची तर्रीवाली आमटी.

 

अगदी इतिहासच पहायचा ठरवला तर मनुचरित्र या ग्रंथामध्ये याचा पाककृती म्हणून उल्लेख आढळतो.14 व्या शतकात अल्लसानी पेदान्ना यांनी लिहीलेल्या ज्ञानकोषामध्ये हा उल्लेख आढळतो़,जे सध्याच्या आंध्रप्रदेशामधून येतात.

 



पुरणासारखा  मंगलकारक नैवेद्य नाही.  ताट भरून,तोंड ,भरून, पोट भरून.चारीठाव असलेले ताट, डावी बाजू,उजवी बाजू भरभक्कम.षड्रसयुक्त व highest protin, vitamin असलेला तरीही टेस्टी असणारा स्वयंपाक .Combination तर अगदीच  perfect .

तुमच्या रसना,जीभ,डोळे,पोट जे काही ज्ञान इंद्रिये आहेत त्यांना समाधान,तृप्तता एकाचवेळी प्रदान करते.

पुरणपोळी आवडत नसेल तर आईने आत्मचिंतन करायला हवे.काही वेगळी पद्धत वापरावी.पिझ्झा, केक शिकण्यासाठी जेवढा वेळ देतो ,तसाच यासाठीही देणे गरजेचे आहे.यामुळे आपले पदार्थ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील.याचे खाद्यमहोत्सवही सामाजिक पातळीवर झाले पाहिजेत.पुरणपोळी बनवण्याचे कौशल्य असणा-यांना याचा उपयोग होईल. पुरणपोळीचे अन्नघटकही आपल्या प्रदेशातील आहेत.आपल्याला हे पचायला सोपे जाणार आहेत.आपल्या शेतक-यांना,व्यापाा-यांना फायद्याचे ठरेल.

अशी ही पुरणपोळी नक्की खाऊन पहा आणि तृप्त व्हा.


To get updates of every post please Subscribe by clicking the subscribe button .


टिप्पण्या

  1. पुरणपोळी हा विषयच मस्त आहे. त्यात तुम्ही कित्ती गोष्टी सांगितल्या आहेत. खूप आवडले वाचायला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा