मावळ सौंदर्य आणि सोनकुसूम पुष्पौत्सव' :
'मावळ सौंदर्य आणि सोनकुसूम पुष्पौत्सव' :
नोकरीच्या निमित्ताने मावळात रहायला आलो ,आता मात्र अगदी मावळाच्या आम्ही प्रेमातच पडलो. इथे उन्हाळ्यात अतिशय थंडगार हवा असते. पावसाळ्यात तर दृष्टीचे पारणे फेडणारे निसर्ग सौंदर्य सर्वत्र दिसून येते. हिरवेगार गवतांचे गालीचे, डोंगरावर उतरलेले ढग,सतत पडणारा पाऊस,खळाळणारे झरे ,धबधबे मावळात असतात.दरी, डोंगर,नाले सगळे काही पावसाने कंच भिजलेले.छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान ज्यांच्या उरात भरलेला आहे असे सर्व आधुनिक मावळे गड-किल्ले सर करत असतात, दऱ्या-खोऱ्यांमधून फिरत असतात. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा-खंडाळा, भाजे लेणी, लोहगड, खांडी धबधबा, कोंडेश्वर याठिकाणी पुण्या-मुंबईच्या पर्यटकांची अगदी गर्दीच असते. रस्ते वाहनांनी फुललेले असतात.
हिवाळ्यातही अतिशय प्रसन्न भासतो हा मावळ! हिरवेगार डोंगर ,पांढरा स्वच्छ प्रकाश,निळेशार विस्तीर्ण आभाळ!
मावळ म्हणजे नक्की काय ह्याबद्दल स.आ.जोगळेकर ह्यांच्या सह्याद्री' ह्या पुस्तकांत सदर्भ आहे की नदी डोंगरातून उतरली की जो विस्तीर्ण प्रांत नदीभोवती तयार होतो त्याला मावळ म्हणतात.(काही ठिकाणी खोरे ,नेहेर पण म्हणतात)..
मावळ हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.जुन्नर प्रांततील 12 मावळ आणि पुणे प्रांततील 12 मावळ अशी एकूण 24 मावळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील बालमित्र मावळे याच परिसरातील.
हा परिसर दरवर्षी पावसाळ्यात पर्यटकांना अतिशय खुणावत असतो. मात्र, यावर्षी कोरोना संकटामुळे पर्यटकांना मागच्या वर्षीच्या स्मृतींवरच (फोटो) समाधान मानावे लागत आहे.
सौजन्य-दै.प्रभात
तेरडा |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा