काव्यांजली चारोळी..विषय -काव्य

 


काव्यांजली चारोळी
विषय -काव्य

📝काव्यलेखन

कविता लेखन
मनाच्या लयीचे अवलोकन
अंतरंग जाणून
आलेखन.

📝रचना
रचना कवितेची
मन उतरे कागदावर
भावना हळूवार
हृदयाची.

📝 भावतरंग

मनाचे अंतरंग
बनून येई कविता
सोडवण्या गुंता
भावतरंग. 


📝चंचल मन
कविता चंचलतेची
असे तरूण वयाची
उर्जा, प्रेमाची
फुलपाखराची.

📝बोबडे बोल
नवकवीचे कवन
अवखळ, सरळ,मुक्त.
भावनाच फक्त
विनानियमन.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा