अबोल प्रीत(कविता)
अबोल प्रीत
प्रितीच्या फुलाने सुगंधित व्हावे
जराशी उधाने मनाची पहावी
जगाला नसावा सुगावा जराही.
मनाला मनाची धडाडी कळावी.
तुला लागले की मला दु:ख व्हावे
अबोल्यातही भाव सारे कळावे
मुक्या भावनांचे शहारे फुलावे
मनासी मनाचे धुमारे मिळावे.
नसे प्रीत सारी असे मीलनात
जगा दावण्या साथ सारी जगात
निराळेच गाणे असावे गळयात
कळावी खुशाली सख्याची जगात
उगा लाजणे आठवांच्या महाली
फुलांच्या झुल्याशी फुकाचे झुलावे
लगामे नसावी कुणाची कुणाला
प्रितीला, दिलाच्या, दिलाने, जपावे.
अर्चना मुरूगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा