काव्यांजली चारोळी( विषय-प्रेम)
काव्यांजली चारोळी
🌹प्रेम
माझे प्रेम
पाखरू होऊन भेटते
तुझ्या मनाशी
क्षणात.
🌹कातळ
भेटावे कशाला
नसे आशा प्रेमाची
मनाच्या प्रितीची
कातळाला.
🌹खोटे बहाणे
बहाणे खोटेच
आणा भाका शपथांचे
न भेटण्याचे
प्रेमिकांचे
🌹विरह
दुरावा देई
आठव त्या प्रेमाचा
कढ भेटीचा
विरहात.
🌹अनुराग
लटका राग
मनी काळजी,जिव्हाळा.
खोटा सोहळा
अनुराग.
🌹मनोमीलन
पूर्तता प्रेमाची
नसे फक्त भेटीत
सर्वस्व देण्यात
मनोमीलनात.
अर्चना मुरूगकर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा