जीवाची भेट (कविता)
जीवाची भेट
वेडा बोलतो स्वप्नात
पुन्हा एकदा मित्रांशी
खूप हसतो गप्पांत
झडतात हास्य राशी.
सत्यात जाणतो मग
हरवले मागे सारे
जरी हजार कारणे
झाले भूतकाळ सारे.
अहंकार आड येई
कधी स्तर समाजात
जरी सुदामा-श्रीकृष्ण
होते सारे पुराणात.
वर्तमान गुंतलेला
असे कामाच्या घाईत
बंधनाच्या चाकोरीत
सहकारी मेळाव्यात.
वेळ काढावा थोडासा
द्यावा दिलासा मनाला
यंत्रवत जीवनात
भेटा आपल्या जीवाला.
अर्चना मुरूगकर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा