मेतकूट

    


     कन्नडमधील 'मेंथे हिट्टूचा' अर्थ  “मेथी पावडर” असतो. यापासून मेतकूट हा शब्द वापरात आला असावा. पण अहो थांबा .. तुम्ही नाक मुरडू नका. ही भुकटी अजिबात कडू नाही… खरं तर भाजलेल्या मेथी पावडरला एक वेगळाच सुगंध असतो.

    "मेतकूट" हा मराठमोळा चविष्ठ पदार्थ !! मऊभात,साजूक तूप आणि वरुन मेतकूट आहः !! याची सर तर कशालाच नाही.
    मेतकूट हा शब्द 'मेतकूट जमणे' या वाक्प्रचारातच ऐकलेला होता. तो खाद्यपदार्थ ही आहे. त्यामुळे मेतकूट या शब्दाला एक विनोदी छटा माझ्या लेखी आहे. त्याचा अर्थ लफडे, भानगड, प्रेम असाही आहे. त्या विषयी जे वाचले त्यावरून 'मेतकूट भात' हेच फक्त एक दुजे के लिये आहेत असे लक्षात आले. 

     जेवणाच्या सुरुवातीच्या काळात लहान मुलांना ते दिले जाते म्हणून ते मसालेदारही  नसते. तसेच भाताबरोबर वरण करण्याच्या कंटाळ्याला तो   पर्याय असावा ,असेही वाटते. 




पावसाळ्यात रात्री नुकता कुकर मधून काढलेला               गरमागरम वाफाळता भात, त्यावर तुपाची धार, मीठ,     लिंबू    आणि मेतकूट...अहाहा स्वर्ग सुख.... मेतकुटात कांदा, कोथिंबीर घालून थालीपीठ पण छान होते. आजारपणात तोंडाला चव नसेल तर मेतकूट म्हणजे हमखास उपाय.कार्बोदके आणि प्रथिने यांचा समावेश यामुळे आहारात घडून येतो.प्रथिनांमुळे आजारानंतर शरीर भरून येण्यासाठीही मदत होते. 

   अजून एक मला आवडणारा प्रकार... 
शिजवलेल्या ३ वाट्या गार भातात ३ चमचे मेतकूट, मीठ, ३/४ चमचे ओले खोबरे, अर्धा चमचा साखर, २ लहान चमचे लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घ्यावे. यात तेल + मोहरी + जिरे + हिंग + हळद + हिरवी मिरची अशी फोडणी देऊन एकत्र कालवून घ्यायचे. अप्रतिम लागतो हा भात.

तर असे बहुउपयोगी मेतकूट घरी बनवले तर इंन्सटं वापरता येते. 
     आजच्या धकाधकीच्या आयुष्यात इन्स्टंट फूडला खूप महत्त्व आले आहे. बाजारात अनेक प्रकारची इन्स्टंट फूड्स मिळतात. पण आपल्या काही पारंपरिक पाककृती पण आहेत. ज्या एकदा बनवून ठेवल्यावर हवे तेव्हा हव्या त्या प्रकारे झटपट वापरता येतात. 
मेतकूट खायच्या आयडीया..
१) तूप भातावर मीठ आणि मेतकूट घ्यायचे आणि कालवायचे.
२) नुसते मेतकूट घेऊन त्यात दही व थोडे मीठ घालायचे
३) ताजी भाकरी घेऊन त्यावर तूप व मेतकूट घालायचे
४) ब्रेड भाजून घेऊन त्यावर तूप वा तेल घालून त्यावर मेतकूट घालायचे
५) पोहे भिजवून त्यावर मीठ व मेतकूट घालायचे. मग त्यावर दही किंवा फोडणी घालायची.
६) नुसते मेतकूट घेऊन त्यात दही व थोडे मीठ घालायचे
+बारिक चिरलेला कांदा. हवी असल्यास फोडणी.
७) मोकळ्या, थंड भातात मेतकूट, तिखट-मीठ, कालवून घ्यावे. फोडणीत मोहरी, जिरे,कांदा, शेंगदाणे टाकून, हा भात टाकावा. खमंग फोडणीचा भात तयार! 
८) मुरमुरे, कच्च्या कांद्याच्या फोडी, तिखट-मीठ, कोथींबीर, मेतकूट तेल टाकून कालवणे.छान चिवडा तयार! 
चिवडा मसाल्याऐवजी मेतकूट वापरता येते. 













ही कृती येथे एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत गेली आहे… आजीपासून आईकडे आणि आता माझ्याकडे… आणि शेवटी आपल्या सर्वांना !!


  घरच्या घरी मेतकूट बनविण्यासाठी  सोप्पी पाककृती पुढील व्हिडिओमध्ये दिली आहे. मिक्सरवर मेतकूट कसे बनवावे याची पाककृती, योग्य प्रमाण या व्हिडिओ मध्ये दिले आहे.  

 खालील ब्ल्यू लिंक प्रेस करून ही पाककृती अवश्य पहा. 






टिप्पण्या

  1. वाहह मस्त माझ्या आवडीच्या पदार्थांची माहिती मिळाली👍👌💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा