वैज्ञानिक संत


 

वैज्ञानिक संत



झाडू मडके हातात
बाबा गावोगावी फिरे
साधे संवाद कीर्तनी
करी गाव स्वच्छ सारे. 

खरा वैज्ञानिक संत
अंधश्रद्ध समाजाचा
परखड उपदेश
संत गाडगे बाबांचा. 

रीन कोणी काढू नका
जादूटोणा मानू नका
द्यावे शिक्षण मुलांना
देव माना माणसांना

सुधारक समाजाचा
व्यवहार सचोटीचा
नदी घाट, धर्मशाळा
रूग्णालये निर्मिकाचा. 

घ्यावा सुज्ञान जणांनी
वसा समाज कार्याचा
थांबलेल्या विकासाचा
स्वच्छतेचा, शिक्षणाचा. 

अर्चना मुरूगकर. 










टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा