कोसळती स्वप्ने
कोसळती स्वप्ने
लोकशाही भारत माझा
आजही कागदावर राहिला
धार्मिक तेढ समाजगुंता
रोज वाढतच राहिला.
हौतात्म्य वीरांचे कर्तव्य,
रोजची दिवाळी सीमेवर
वाट्टेल त्यासाठी भांडती
स्वार्थी नेते माईकवर
भ्रष्टाचार शिष्टाचार मानून
वाढवावेत उद्योग स्वत:चे
यात साथ देईल तोच नेता
आणि सरकार त्याच पक्षाचे
जाणत्या शिकलेल्यांना कुंपणे
केव्हाच झाली अंथरुणे छोटी
मुलांचे शिक्षण, छोटेसे घर
धावत रहाती मिळावाया रोटी
शेतकरी कधीचाच हरला
हरतोय आता तरूण आमचा
आदर्श राष्ट्राची कोसळती स्वप्ने
रस्ता धरतोय परदेशाचा.
अर्चना मुरूगकर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा