मखाना (कमल बीज), माहिती आणि उपयुक्तता.
मखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राकृतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. या बियांना खास मंद सुगंध असतो.
भारतात पूर्वापार खाल्ला जाणारा मखाना म्हणजे कमळाचं बी पुन्हा एकदा डाएटमध्ये सहभागी झाला आहे. मखाना खाल्यामुळे आरोग्य चांगलं राहतच पण त्याचबरोबर इतर अनेक फायदे होतात.
मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात. मधुमेहावर जर तुम्ही रोज चारच मखाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डायबेटिस कमी होतो.
दैनिक आहारांत किमान २५ ग्रँम मखाना रोज खायला हवे. बाळंतिणीला पौष्टिक आहार म्हणून खिर, लाडु, वैगेरे स्वरूपात खायला देतात.
वजन कमी करण्यासाठी आहे, त्यांच्याकरता मखाने खूपच फायदेशीर आहे. कारण याने पोट लवकर भरते.
मखान्याच्या सेवनाने अनिद्रा, अस्वस्थ वाटणे, दूर होते. मखान्यात पोटँशिअम भरपूर मात्रेत असल्याने रक्तप्रवाह नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाबावर अंकुश राहतो. यात सोडिअम अत्यल्प प्रमाणांत असते. मखाना ग्लूटेन, मुक्त आहे, व प्रोटिन युक्त आहे. ग्लायसेनिल इंडेक्स अतिशय कमी असल्याने याचे सेवन मधुमेह रुग्णांनी नियमित करावे.
याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, याची निर्मिती करण्यासाठी कोणतेही रासायनिक खतं किंवा किटकनाशके वापरली जात नाही, त्यामूळे हे 'आँर्गेनिक फूड' आहे.
वृद्ध लोकांना दिवसातून दोन वेळा मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो. हे यासाठी सांगितलं जातं कारण यात कॅल्शीयमची मात्रा मुबलक प्रमाणात असते. कॅल्शीयम हे वाढत्या वयासोबत कमजोर होणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्याचे काम करतं. तरूणांची हाडं अधिक बळकट होतात. म्हणून तरुणांनी सुद्धा मखाना खायला आवडीने खायला हवा.
ज्यांच्या शरीरात रक्ताची कमी असते आणि त्यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवतो त्यांनी तर मखाना नक्कीच खायला हवा. अॅनेमिया असणाऱ्या अनेकांना याच्या चविष्ट रेसिपीज नक्कीच आवडतील.
अशीच एक रेसिपी मखान्याची खीर कशी बनवावी हे खालील व्हिडिओ मध्ये दाखवले आहे. हा व्हिडिओधन्यवाद.
वृद्ध लोकांना दिवसातून दोन वेळा मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो. हे यासाठी सांगितलं जातं कारण यात कॅल्शीयमची मात्रा मुबलक प्रमाणात असते. कॅल्शीयम हे वाढत्या वयासोबत कमजोर होणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्याचे काम करतं. तरूणांची हाडं अधिक बळकट होतात. म्हणून तरुणांनी सुद्धा मखाना खायला आवडीने खायला हवा.
खूपच सुंदर माहिती
उत्तर द्याहटवाखूपच उपयुक्त
उत्तर द्याहटवाmast!
उत्तर द्याहटवाThank you.
हटवाReally easy, nice and healthy dish .. will definitely try👍
उत्तर द्याहटवाउपयुक्त माहिती, खीर बघून तोंडाला पाणी सुटलं, पण आधी जे वाचलं त्यानुसार डायबेटीस असल्यामुळे नुसतं खाल्लं पाहिजे.
उत्तर द्याहटवा