गणेश चारोळ्या भाग-4

 


    नवीनच बनलेल्या ' ब्लॉग लेखन 'व्हाट्सएप ग्रुपवर सोनाली देवळेकर मॅडमशी ओळख झाली. Morning moraya या मथळ्याखाली रोज गशाचे नवे चित्र येत असे. त्यावर रोज नवी चारोळी लिहून त्या पाठवत असत. आम्हालाही लिहिण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी ही चित्रे ग्रूपवर पाठवण्यास सुरूवात केली. हा अद्भुत योग त्यांच्यामुळेच जुळून आला.अगदी 10-15 चारोळ्या सकाळीच 9 ते 10 वाजेपर्यंत वाचायला मिळतात.

      प्रत्येकाला बाप्पा आपल्या दृष्टी प्रमाणेच दिसतो. लिखाणाची ढबही वेगवेगळी. भाव तोच, भक्ती तिच शब्दांकन मात्र वेगवेगळे. ना कसली स्पर्धा, ना कोणते बंधन! रोज सकाळी शब्दसुमनांनी बाप्पाची पूजा! नवलेखकांना विद्याधीश गणेशाचा जणू आशीर्वादच हा. 

       यामुळे चित्र कवितांचा नवा छंदच जडला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ठाण्यातील कलाकार श्री. दिलीप वैती सर ही चित्रे पाठवतात. त्यांच्या व्यस्त दिनचर्येत नवी जबाबदारीच.या सगळया त्या दिवशीच्या कवितांचे ते पी. डी. एफ. ही बनवूनही पाठवतात.त्यांनी पाठवलेली चित्रे पाहून आम्ही अगदी स्तिमित होऊन जातो.केवढी रूपे बाप्पाची! या चित्रांसाठी वैती सरांचे व विश्वविनायक ग्रूपचे मानावे तेवढे आभार कमीच.ते सर्वांच्या कवितांचे मनापासून भरभरून कौतुकही करतात.यामुळे नवनिर्मिती ची प्रेरणा मिळत आहे. बाप्पामय मन बनल्यामुळेच हे घडून येत आहे. 
       


पाच -दहा मिनिटे बाप्पाच्या चित्राकडे पहात पहातत्याच्या रूपातच बुडून जायला होते.कविता आपसूकच तयार होते. यामुळे गणेशाची रूपे, त्यांचा अर्थ यांचाही थोडा अभ्यास झाला.सर्वांच्या कवितांमधील साधेपणा, शब्दमाधूर्य, उत्स्फूर्तता पाहून अचंबित व्हायला होते.

 ही सेवा अशीच घडत राहो, ही बाप्पा चरणी प्रार्थना. 🙏 

यात मी अर्पण केलेल्या काव्यसुमनांजलीतील काही गणेश चारोळ्या इथे पोस्ट करत आहे.








































 धन्यवाद 🙏🙏


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धबधब्यावरील अपघाताची कारणे व उपाय*

हायकू

जाणता राजा