हसे इंद्रावती
निरभ्र निळे वरती अंबर
उमटे चित्र शांत पाण्यावर
तरल तरंगांतूनी तरंग उमटती
निर्मळ पात्रातूनी हसे इंद्रावती.
थोडीशी झाडी, काठही सुंदर
रेशमी झबल्याची हिरवी झालर
तपकिरी मृदेचे कोंदण सभोवार
नयन खिळवती दृश्य मनोहर.
ओले वारे ल्यावे साऱ्यांनी
चिंब भिजावे निसर्ग प्रेमाने
करावे निसर्गरक्षण हर्षभराने
अनुभवावे उद्या हेच लेकराने.
मानव असे औट घटकेचा
निसर्ग अमृत अनंतकाळाचे
करावा जतन ठेवा निसर्गाचा
करी वापर मनुजा चातूर्याचा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा