मोगरा

 


 



शुक्रवार:२/७/२१ 




*काव्य प्रकार: अष्टाक्षरी*


*विषय:-  फूल*

*शिर्षक*- *शांत बहरे मोगरा* 



रंग मोत्याचा पांढरा

खुले राजस नखरा

कंच हिरव्या पानात

शांत बहरे मोगरा


मन गंधित हसरे

जसे अत्तर पसरे

फुले कोमल वेचता

पुन्हा जोमाने बहरे


वेणी केसात माळता

मनी मोगरा गुंफती

रूपा रूपाला भेटता

वाढे सौंदर्य प्रचिती


साजणाच्या आठवाने

मन वेडे पिसे व्हावे

सुवासिक ओढ याची

फूल ओंजळीत घ्यावे


©अर्चना मुरूगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा