गझल

 *वृत्त -कलावती*

लगालगा ललगागा लगालगा गागा



असेल त्याच सुखाला जपायचे आहे

हसून याच दिसांना बघायचे आहे


अनंत डंख जगाने दिले नसे चिंता

फिरून त्यात मनाला तरायचे आहे


मजेत वागत जावे जगासवे वेड्या

कशास खंगत जातो जगायचे आहे


फकीर तू धरतीवर असेच चालावे

कधीतरी जगताना मरायचे आहे


कशास माजवतो यादवी जगामध्ये

प्रभूस त्या भवताली पहायचे आहे


अर्चना मुरुगकर. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा