(हझल) लवंगलता मात्रावृत्त




 हझल

लवंगलता मात्रावृत्त

८-८-८--४

गेंडे होते वाकून उभे मिरवणूक बघ झाली

लाथा बसता कळले मजला निवडणूक बघ झाली


जेथे तेथे सांगत होते अभ्यासाची महती

 बैल खळ्याशी फिरतो नुसता फसवणूक बघ झाली


मेडल बिल्ले ढेकी मोठी नोकर भरती झाली

नंदीबैला टाय घालुनी करमणूक बघ झाली


मुकी राहुनी निती नियमा निमूट साहत होती

भित्री वेडी समाज म्हणतो पिळवणूक बघ झाली


म्यूट अनम्यूट कळतच नाही आजोबांना अजून

एल. के. जी. ची नात पहाते हसवणूक बघ झाली


उडी मारतो गडगड हसतो विदूषक दिसे भारी

रडू दडवणे सवयच बनली वागणूक बघ झाली



अर्चना मुरूगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा