पाऊस

 


वृत्तबद्ध -कविता


अननज्वाला


होई लगबग


तप्त उकाडा वैशाखाचा दाहत जाई

प्रतिक्षेत वर बघती सारे तगमग होई


अवचित येती मेघ सावळे भरून सारे

काळोखाने झाकत जाती क्षणात सारे


हळू येतसे थंड लहर ती मग वाऱ्याची

तुटे साखळी या वाऱ्याने कृष्ण ढगांची


सुखद गारवा क्षणात पसरे जाई तगमग

थेंब टपोरे टपटप पडती होई लगबग


शेतकरी मग सुखात न्हाई सुख स्वप्नांनी

मृद्गंधाच्या नवलाईने गंधित धरणी


झाडे पाने प्राणी न्हाती आनंदाने

चराचरी हे भाव नाचरे वर्षावाने


अर्चना मुरूगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा