संभ्रम पडता तरून जावे

 




संभ्रम पडता तरून जावे

गुरूस करतो वंदन आम्ही
असे संस्कृती आमची
जाणिवेचा क्षण नकळे जरी
प्रथा आतल्या श्रद्धा भक्तीची

दबकत दबकत जाता पुढती
विश्वासाने बोट पकडतो
नकळत आमच्या आम्ही आता
जगामध्ये चालू लागतो

अंतर्बाह्य जाणती आम्हाला
प्रकाशाच्या दाखवती वाटा
जवळ असता त्याच्या आम्ही
आनंदाला नसतो तोटा

खडतर अवघड रस्ता दिसतो
प्रश्नांचे मग काहूर उठते
आधार मिळता आम्हा गुरूंचा
सहज सुंदर वाट सापडते

नतमस्तक मी चरणावरती
वंदन करते मनोभावे
दिशा दाखवे गुरुमाऊली
संभ्रम पडता तरून जावे

अर्चना मुरुगकर
तळेगाव दाभाडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा