गझल वृत्त-रागरंग
वृत्त -रंगराग
गालगा लगागागा गालगा लगागागा
राजसी पलंगाचा थाट ही नको आहे
कष्ट ज्यात नाही ते ताट ही नको आहे
सोहळे सभेमध्ये चालल्या गळाभेटी
बेगडी प्रसिद्धीची लाट ही नको आहे
साखळ्या पहाऱ्यांची बंधने नको आता
कालबाह्य रूढींची वाटही नको आहे
गोड बोलतो स्वार्थी कार्य साधण्यासाठी
मतलबी स्वभावाचा भाटही नको आहे
रोग तोच आताही नांदतो जगामध्ये
रांधण्या सणासाठी हाटही नको आहे
अर्चना मुरुगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा