गझलवृत्त-सती (जलौघवेगा)
गझलवृत्त-सती (जलौघवेगा)
बळी गरीबी तुला सदाची बहाल आहे
निसर्ग वागे मनाप्रमाणे कमाल आहे
सुळीस देती तुझी गरीबी क्रमाक्रमाने
तुझी कहाणी जगात आता मिसाल आहे
नवीन धंदे नवीन वाटा पहात जाती
तुझ्या प्रमाणे जगू पहाणे बकाल आहे
दुरावताना उदास वाटे घरास अपुल्या
दिसे चवन्नी नसे उपाशी धमाल आहे
हताश वाटा नकोच आता पुन्हा जगावे
प्रयत्न वादी जगी स्वत:च्या खुशाल आहे
अर्चना मुरुगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा