*गझलवृत्त -व्योमगंगा*





 *गझलवृत्त -व्योमगंगा*


लगावली-गालगागा गालगागा गालगागा गालगागा


मी अशी गुंतून जाते आरशांशी बोलताना

मी कधी हरवून जाते आठवांशी बोलताना


साद ऐकू येत आहे सांजवेळी साजणाची

मी सदा व्याकूळ होते वेदनांशी बोलताना


प्रेमपत्रे वाचताना रोखलेले श्वास होते

आसवांचे पाट झाले अक्षरांशी बोलताना


सोडलेली आस आता भेटण्याची बोलण्याची

दोर सारे कापलेले वास्तवांशी बोलताना


का नशीबा वंचना ही भंगलेल्या अंतरांची

भांडताना मूक होते देवतांशी बोलताना


©©अर्चना मुरूगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा