रंगराग गझल






 गझल

वृत्त रंगराग

लगावली-गालगा लगागागा गालगा लगागागा

हे तुझे असे खोटे वागणे बरे नाही

प्रेम भावना माझ्या तोडणे बरे नाही


मित्र मानता मागे बोलणे अविश्वासी

जोजवून नात्याला मोडणे बरे नाही


भाव देत पैशाला तोलणे मना लागे

सार तेच जीवाचे मानणे बरे नाही


चंद्र झोपला होता रात्र लोटली सारी

आस खंगली माझी टाळणे बरे नाही


रोज येत स्वप्नाशी थांबणे असे का रे? 

घाव तेच प्रेमाला घालणे बरे नाही


अर्चना मुरूगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा