वृत्तबद्ध काव्य प्रेमी
अष्टाक्षरी कविता
माहेर
माझे माहेर लाडाचे
करी कौतुक गुणांचे
बने व्यक्तीमत्व सारे
सार त्यांच्या संस्काराचे
आई प्रेमाने रांधते
बाबा जवळ बसती
नांदे प्रेमाचे गोकुळ
ओटी प्रेमाने भरती
लेक माहेरी जाताच
लाड भाच्यांचे करते
पाहे स्वतःस भाचीत
पुन्हा शोडषा बनते
नसे अपेक्षा वाट्याची
मोठेपण तरी गाते
उरी गोठे समानता
गीत माहेरचे गाते
असे चैतन्य माहेर
झरा सुखाचा माहेर
पुसे दुखले खुपले
करी प्रेमाचा आहेर
अर्चना मुरूगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा