कविता पावसाची

 

कविता पावसाची


गंमत जंमत होती सारी

पावसामध्ये बालपणीच्या

सततंधारा वळचणीतुनी

गाण्यामधुनी भिंगोऱ्यांच्या


सुसाटवारा कोसळधारा

काॅलेजमधल्या रस्त्यावरचा

मन भाजताना धुंद होतसे

काळ असे तो मोहरण्याचा


पाऊस हरित डोंगरमाथी

सोहळाच नव तारुण्याचा

उत्साहाला येई भरती

मित्रांसंगे चढतानाचा


खळखळ भरभर पाणी वाहे

धबधब्यातुनी ओढ्यांमध्ये

तुडुंब भरल्या नदीत दिसतो

थेंबांमध्ये धारांमध्ये


अवनी बनते सुंदर तरणी

हिरवाईचा शालु नेसुनी

झरे वाहती चैतन्याचे

फुले लगडली पानांमधुनी


पडतो वेडा पाऊस असा 

तनामनात रुजून बसला

दिसता निर्मळ धारा याच्या

आठवणीने पुन्हा झिरपला


पाऊस असे विरह तराणे

पाऊस जसा प्रणय खुणावे

पाऊस असे उधाणवारा

चराचराने गाणे गावे


अर्चना मुरुगकर 🌧💦











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा