लवंगलता मात्रावृत्त

 



छंदोरचना 

लवंगलता मात्रावृत्त

8-8-8-4



काय नेमके आहे


मनात माझ्या विश्व वेगळे दडून बसले  आहे

सजवत फुलवत गोंजारत मी त्याला जपते आहे

लोकांसाठी वेडी ठरते अजब अनोखी बनते

कळतच नाही मनात माझ्या काय   नेमके आहे


पेलत पेलत खोटी नाती हासत जगते आहे

ना पटण्याऱ्या मुद्द्यांवरती मनात बोलत आहे

होतो आतच अग्नी मोठा जाळत जातो सारे

एक हुंदका अन एकाकीपण आत साठले आहे


समाज समाज ज्याच्या साठी जगणे माझे आहे

निर्णय माझे बदलत जाण्या बनला कारण आहे

मदत मागता तटस्थ बनुनी अंतर  राखत जातो

विसंगतींना उत्तर नसते रडणे हाती आहे


मेळ साधता परंपरांचा आयुष्य पुढेच नेले

नव्या पिढीचा वेग पकडुनी अजून बदलत आहे

आस वाढता ओझे वाढे  त्यातच दबते आहे

गात्रे थकता मनही थकते तरी उभारी आहे. 


अर्चना मुरूगकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा