आयुष्याची भरली शाळा..



*आयुष्याची भरली शाळा*


आयुष्याची भरली शाळा

खडतर गणिते दिसू लागली

कष्ट मागते नवी पायरी

विश्वासाने चढते छकुली


वणवण फिरती आईबाबा

पोट रिकामे भरण्यासाठी

सगुणा रांधत शिकते आहे

भविष्य सुखाचे घडण्यासाठी


राबराबुनी मिळतो तुकडा

चवच आगळी सुंदर न्यारी

शिकण्यासाठी नसती सुविधा

प्रत्यक्ष शारदा बसे भूवरी


पोट उपाशी जाणिव देते

भोवतालच्या खऱ्या जगाची

बळकट बनती कोमल खांदे

धुरा पेलत मग कामाची


अर्चना मुरूगकर

तळेगाव दाभाडे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा