क्लाऊडमध्ये मेघ दिसतो

 



क्लाऊडमध्ये मेघ दिसतो 


कालिदास लपलेला इथे

'मेघदूत' मी जगतो आहे

मेघ जरी ना मला भेटला

व्हाट्सअपची साथ आहे


करतो अल्लड विनवण्या

नेटची साथ अखंड असू दे

नकळत तिच्या तिला पाहू दे

अपडेट पटकन स्टेटसचे दे


छोटे मोठे विनोद दिसता

साथ तिच्या हसण्याची दे

खाणाखुणा पटकन समजुनी

त्या टोकाला तीच असू दे


डोळ्यामधले पाणी लपवती

हसऱ्या बाहुल्या इमोजीतल्या

प्रेम दाखवती हळूच दुरूनी

गुलाब, बदाम ,नाचऱ्या बाहुल्या


भांडण, रूसणे,हसणे, फसणे

सारेच व्यक्त एका क्षणात

सूचक व्हिडिओ मनधरणीचे

डोस मौलिक हजर क्षणात


क्लाऊडमध्ये मेघ दिसतो 

तळमळ पोहोचे इथून तिथे

संजयासमान बघतो सारे

जशास तसे तिथले इथे


प्रेम, विरह, ओढ तीच रे

मेघसावळा अजून तसाच

तंत्रज्ञान देई साथ मनाला

व्यक्त होतो अजून तसाच


अर्चना मुरुगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा