पाऊस

 

वृत्त -समुदितमदना

8+8+8+3

*प्रलयच आला जणू*


पाउस आहे जीवनदायी पोषणकर्ता जगी

पशुपक्षी अन  शेतकऱ्यांच्या दाणा पाणी मुखी

चातक बनुनी धरणीमाता स्वागतकर्ती उभी

आतुरतेने वाट पाहते ये लवकर कर सुखी


रूप बदलुनी आला वाटे विध्वंसक हा दिसे

अवचित पाणी धावत सुटले सैरावैरा पळे

रौद्ररूप हे धारण केले काळच बनला  जणू

जलमय झाले सगळे जीवन जना रडू कोसळे  


 घरात शिरुनी  दैना केली मुक्त उधळला असे

 डोंगर झाडे पाडत फिरतो राक्षस भासे अता

तांडव चाले मृत्यूचा जो प्रलयच आला जणू

शेतीवाडी नेली धुवुनी सगळे खचले अता


आक्रोशाचा डोंब उसळता डोळे देवाकडे

आशेने तो घालत आहे मदतीचे साकडे

जनता बनली भयभीत अता नेते झेपावले

आरोपांच्या फुशारक्यांच्या झडती फैरी गडे


अर्चना मुरुगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा