गझल

 




वृत्त- तोटक

ललगा ललगा ललगा ललगा


यमपाश अता टळणार कसे

नित रोग दिसे पळणार कसे


भवपाश मनी तुटलाच अता

मनमीत तिचे कळणार कसे


सगळेच इथे ढवळे बगळे

वगळून नवे मिळणार कसे


बरसात दिसे जळली नुकती

जमिनीत अशा फळणार कसे


सडके कुजके जमले भवती

टाळून तया वळणार कसे


अर्चना मुरुगकर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा