तळीये.. आनंदकंद गझल

 वृत्त-आनंदकंद

गागालगा लगागा गागालगा लगागा


पाणीच मातलेले गावास वाटले रे

आक्रोश दाटलेले गावास वाटले रे


एका क्षणात आले आक्रीत काळरूपी

आभाळ फाटलेले गावास वाटले रे


प्रेतास शोधताना काळीज ठार झाले

डोळेच गोठलेले गावास वाटले रे


कोणास हाक मारू झाला पहा ढिगारा

समशान थाटलेले गावास वाटले रे


 नामोनिशाण मिटले होते इथे तळीये

 इतिहास गाडलेले गावास वाटले रे


अर्चना मुरुगकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा