आनंदकंद गझल
**
आनंदकंद ( तरही गझल )
गागालगा लगागा गागालगा लगागा
( जे चांगले जुने ते सांगायचे नव्याने )
गझलकार विजय खाडे यांचा उला मिसरा
जे चांगले जुने ते सांगायचे नव्याने
ते बोल साखरेचे बोलायचे नव्याने
त्वेषात भांडताना काळीज भंगलेले
हातात हात घेता सांधायचे नव्याने
चित्कार अंतरीचे रोगात आप्त गेले
आधार जीवनाचे शोधायचे नव्याने
अंगार पेटलेले पाण्याविना उन्हाळे
कासार गारव्याचे बांधायचे नव्याने
भागीरथास भेटे गंगा प्रयत्नवादे
कष्टात घर्मबिंदू गाळायचे नव्याने
अर्चना मुरूगकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा