अभंग
दिनांक - १३ जुलै २०२१
विषय : विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठल
अभंग रचना - ६-६-४
*शीर्षक : ठेवा अभंगांचा, मुखी गाऊ*
मायबाप माझा| विठु माऊली तू|
सावळा सखा तू| पांडुरंगा ||१||
उभा पंढरीसी| राजा वीटेवरी ||
कर कटेवरी | ठेवुनीया||२||
भागवत धर्म| भेदाभेद नसे|
भक्ती नांदतसे| सर्वत्रच||३||
आस भेटीलागी| पाऊले चालती|
वारीच्या संगती| पंढरीसी ||४||
नाही भेट झाली| चुकली पायरी|
दु:खी वारकरी| कोरोनाने ||५||
जाणुनी संदेश| संत सज्जनांचा|
ठेवा अभंगांचा| मुखी गाऊ||६||
संयम धरावा| नियम पाळावा |
काळ ओळवावा | शहाण्याने||७||
ज्ञानामृत मिळे| वाचून ग्रंथांना |
आचरणी आणा | उपदेशा ||८||
समतेचा झेंडा| रोवू जगामध्ये|
रंगू भक्तीमध्ये| नाचू गाऊ||९||
सौ. अर्चना रमेश मुरुगकर
तळेगाव दाभाडे-पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा