पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गणेश चारोळी

इमेज
 

पर्यटन

इमेज
  पर्यटन- भ्रमंतीचे  महत्व पर्यटन ही एक अनुभूती आहे. नेहमीच्या त्याच त्या कामातून माणूस बाहेर पडतो. त्याला हा बदल सुखावणाराच असतो.थंडगार मोकळी हवा, निसर्गाचे सन्निध्य आणि कुठलेच वेळेचे बंधन नसणे यासारखे सुख नाही. रोम रोम आनंदाने पुलकित होतो. यातून भिन्न संस्कृती समजते. वेगवेगळ्या ठिकाणचे आहार विहार, आचार, पोषाख यांची माहिती मिळते. खाद्यपदार्थांवरही ताव मारता येतो. बरं आजच्या काळात सारे कुटुंब एकमेकांना पूर्ण वेळ देऊ शकते. अनेक सफरी संस्मरणीयही ठरतात.   पर्यटनामुळे अनेक ऐतिहासिक ठिकाणे प्रत्यक्ष पहाता येतात, भौगोलिक वैविध्य समजते, जैविक वैविध्य, वेगळी झाडे, माती, डोंगर, कधी बर्फ तर कधी समुद्र अनुभवता येतो. अनुभवणे हे व्ययक्तिक पातळीवरचे असते.माणसाला ताणतणावांचा विसर पडतो. पुन्हा कार्य करण्याची उर्मी मिळते. संघामुळे  आनंद वाढतो.   माणसाचे आपल्या घरावर प्रेम असते. घर सुटतच नाही. या प्रवासाच्या धामधुमीत सर्व कष्टदायक जबाबदाऱ्यांतुनही आपसूकच मुक्तता होते. आपल्यामुळे जगात काही फरक पडत नाही, हे तरी कळतेच. उत्साहाने जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती वाढते. तीच ती रूढी बंधने मागे सुटतात.  जागोजागी स