पोस्ट्स

गणेश

गझलेचे रसग्रहण

*वाचले ना चाळले त्यांनी मला बघ कसे चुरगाळले त्यांनी मला* वर्चस्व सिद्ध करण्याची घाई असली की बरेचदा प्रस्थापित लोक इतरांना बदनाम करतात. पूर्वग्रहदूषितपणाही  असू शकतो.  वाचणे.. सखोलपणे जाणणे चाळणे.. वरवर पहाणे हे काही न करता म्हणजेच जाणून न घेता हेटाळणी केल्याचे, त्यांना हवा तोच वापर करून घेतल्याचे शल्य यातून दिसते.  चूरगाळणे.. नाकारणे, फेकून देणे *खोल पुरले तर पुन्हा उगवेन मी* *याचसाठी जाळले त्यांनी मला* माझे विचार, व्यक्तीमत्व नकोआहेत. त्याची भिती आहे. मी पुन्हा उभारी घेऊ नये यासाठी मला कायमचे नष्ट केले.  * आजही केली सुखांची याचना* *आजही फेटाळले त्यांनी मला* स्रिया, समाजात अनेक कारणांमुळे दुय्यम स्थान असणाऱ्या साऱ्यांना कायद्याने समान न्याय दिला आहे.  या काळातही हक्कांची जाणीव करून दिली की नकोसे असते. सुखाची याचना करावी लागते.  होईल तेवढा अपमान करून माझी मागणीच फेटाळून लागली. की शक्यताच उत्पन्न होऊ नये.  * बोकडासम कापतांना समजले* *आजवर का पाळले त्यांनी मला* उपेक्षितांचे जीणे दुय्यमतेचे. कधी लाड  झालेच तर समजून घ्यावे, काही तरी फायद्यासाठी होत आहेत...

गणेश

इमेज
 

संकष्ट चतूर्थी

इमेज
 

गणेश

इमेज
 

तूच बेभान व्हावे

इमेज
  *छंदोरचना  *तूच बेभान व्हावे* तनाने भिजावे मनाने भिजावे अशा श्रावणी खास पाऊस धारा असा मास आला जगी उत्सवाचा क्षणी ऊन येई क्षणी चिंब धारा धरेने नहावे तरुंनी नहावे पुन्हा जीवनाचा नव्याने सहारा तृणांनी दवांच्या मण्यांना धरावे धुमारे मनाला जलाचा शहारा नदीने झऱ्याने खळाळा वहावे सरी नाचताना सुखाचा नजारा घनांच्या पखाली झडींचे तराणे घुमे गर्द रानात ओलाच वारा सणांच्या दिसांनी घराने खुलावे सवे फेर घ्यावे नवे गीत गावे सजावे धजावे मुलींनी सुनांनी सग्यांच्या मधे जीवनी बागडावे धरित्रीतल्या गंध मोदात साऱ्या मनुष्या अरे तूच बेभान व्हावे ऋतू संगतीने जगी सुंदराने कधी काव्य व्हावे कधी नृत्य व्हावे अर्चना मुरूगकर

गणेश

इमेज