पुरणपोळी
पुरणपोळी पुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे . देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष सणाच्या निमित्ताने दाखवला जातो . होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वा चा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्ताऱ पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धार्मिक पंरपंरत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. त्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात . ...