सुभाषिते व मराठी अर्थ : भाग २

 भाग 

संस्कृतमधील सुभाषिते लहान संस्मरणीय श्लोक आहेत.

संस्कृतमधील 'सुचा अर्थ चांगला,

'भाषित 'चा अर्थ बोलणे,

 ज्याचा एकत्रित शाब्दिक अर्थ 'चांगले बोलणेअसा आहे.

सुभाषिते  नैतिक  सल्लेसांसारिक  सूचना  करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून  ओळखले जातातसुभाषितांमध्ये  कवितेतून संदेश दिला जातो.

सुभाषिते नेहमीच  वाक्प्रचाररूपात असतात.ती काव्यात्मक स्वरुपात रचलेली असतात  आणि भावनाकल्पनाधर्म , सत्य किंवा परिस्थितीचे संक्षिप्त वर्णन  करतात .

बहुतेक सुभाषितांचे लेखक अज्ञात आहेतभारतीय महाकाव्य या स्वरूपात लेखन केले गेले.लोकांच्या स्मरणात असलेल्या सुभाषितांचा संग्रह करून  सुभाषित संग्रह तयार केले गेले.

संस्कृत सुभाषितांची गेयताशब्दमाधूर्य आजही मुलांना आवडतेसुभाषितांमधून मिळणारी शिकवण जन्मभर  सोबत असतेआजच्या मुलांनाही सुभाषिते दीपस्तंभसारखी मार्गदर्शक ठरतीलहीच आशा.

 


1.

आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम्

अधनस्य कुतो मित्रम् अमित्रस्य कुतो सुखम्

अर्थ :

आळश्याला  विद्या कशी मिळणार? अडाण्याला धन कसे मिळणार?|

दरिद्री माणसाला कोणीही मित्र नसतो . मित्र नसणाराला सुख कसे मिळेल?

 

2.

नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुणः |

गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा ||

 

अर्थ :

सौन्दर्य हा माणसाचा दागिना आहे. गुण हा रूपाचा अलंकार आहे. ज्ञान हा गुणाचा अलंकार आहे. क्षमशीलता हा ज्ञानाचा अलंकार आहे.

 

3.

अनालस्यं ब्रह्मचर्यं शीलं गुरुजनादरः |

स्वावलम्बो दृढाभ्यासः षडेते छात्रसद्गुणाः ||

 

अर्थ :

 उद्योगीपणा, ब्रह्मचर्य, उत्तम चारित्र्य, शिक्षकांबद्दल आदर, स्वावलंबन, सतत अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे सहा गुण आहेत.

 

4.

सम्पुर्णकुम्भो करोति शब्दम् अर्धो घटो घोषमुपैति नूनम्

विद्वान कुलीनो करोति गर्वम् जल्पन्ति मूढास्तु गुणैर्विहीनाः ।।

 

 

अर्थ :

पाण्याने पूर्ण भरलेल्या घागरीचा (घागरीतील पाण्याचा) आवाज येत नाही, अर्धवट भरलेल्या घागरीचा मात्र येतो. त्याचप्रमाणे विद्वान, चांगली माणसे गर्व करत नाही, अडाणी मूर्खमात्र उगाच बडबड करतात.

 

5.

अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम्

अन्नेन क्षणिका तृप्तिः यावज्जीवं विद्यया

 

अर्थ :

अन्नदान श्रेष्ठ आहे, पण विद्यादान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण अन्नामूळे त्यावेळेची भूक भागते मात्र विद्येमूळे संपूर्ण आयुष्याची.

 


 

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा