गणेश चारोळ्या-भाग-3

 

       नवीनच बनलेल्या ब्लॉग लेखन व्हाट्सअॅप ग्रुपवर सोनाली देवळेकर मॅडमशी ओळख झाली. Morning moraya या मथळ्याखाली रोज गणेशाचे नवे चित्र येत असे. त्यावर रोज नवी चारोळी  लिहून त्या पाठवत असत. आम्हालाही लिहिण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी ही चित्रे ग्रूपवर पाठवण्यास सुरूवात केली. हा अद्भुत योग त्याच्यामुळे जुळून आला.अगदी 10-15 चारोळ्या सकाळीच 9 ते 10 वाजेपर्यंत वाचायला मिळतात.

      प्रत्येकाला बाप्पा आपल्या दृष्टी प्रमाणेच दिसतो. लिखाणाची ढबही वेगवेगळी. भाव तोच, भक्ती तिच,शब्दांकन मात्र वेगवेगळे. ना कसली स्पर्धा, ना कोणतेबंधन! सकाळीच शब्दसुमनांनी बाप्पाची पूजा. नवलेखकांना विद्याधीश गणेशाचा जणू आशीर्वादच.

      चित्र कवितांचा जणू छंदच जडला. सगळ्यात हत्वाचे म्हणजे ठाण्यातील कलाकार श्री. दिलीप वैती सर ही चित्रे पाठवतात. त्यांच्या व्यस्त दिनचर्येत नवी जबाबदारीच.या सगळया  त्या दिवशीच्या कवितांचे ते पी. डी. एफ. ही बनवूनही पाठवतात.बाप्पाचे नवे चित्र पाहून आम्ही अगदी स्तिमित होऊन जातो.यासाठी त्यांचे व विश्वविनायक  ग्रूपचे मानावे तेवढे आभार कमीच.सर्वांच्या कवितांचे मनापासून कौतुकही करतात. बाप्पामय मन बनल्यामुळेच हे घडून येत आहे.

      पाच -दहा मिनिटे बाप्पाच्या  चित्राकडे पहात पहात त्याच्या रूपातच बुडून जायला होते.कविता आपसूकच तयार होते. यामुळे गणेशाची रूपे, त्यांचे अर्थ यांचाही थोडा अभ्यास झाला.

  सर्वांच्या कवितांमधील साधेपणा, शब्दमाधूर्य, उत्स्फूर्तता पाहून अचंबित व्हायला होते.

 ही सेवा अशीच घडत राहो, ही बाप्पा चरणी प्रार्थना.

👏🙏🙏माझी काकू, मी आणि हे,आम्ही तिघेही या कविता लिहितो. 

न बोलताही एकमेकांची भेट होत असते. कुणी काय लिहिले याची उत्सुकता ही असतेच. 

      या उपक्रमामध्ये माझी काकू सौ. कालिंदी बल्लूरकर यांनी  लिहिलेल्या काही गणेश चारोळया.


























धन्यवाद 🙏🌹

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरे ब्रह्मकमळ

देवीची नऊ रूपे

जाणता राजा